अमरावती : एका खासगी संस्थेत टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत महिला कर्मचाऱ्याच्या भविष्य निधीच्या (EPF) रकमेत 86 हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप निवृत्त महिला कर्मचाऱ्याने केला. याप्रकरणी माजी आमदार श्रीकांत गोविंद देशपांडे (former mla shrikant deshpande) यांच्यासह संस्थेच्या सहा जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल झाला. (FIR file against six people including former mla shrikant deshpande in epf money case in amravati)
हुकूम वल्लभजी कासट (वय 65, रा. शंकरनगर), श्रीकांत गोविंद देशपांडे (वय 53, रा. सुभाष कॉलनी), सय्यद राजिक सय्यद गफ्फार (वय 56, रा. पॅराडाईज कॉलनी), ललित ओमप्रकाश कासट (वय 35, रा. एकनाथपुरम), चंद्रशेखर रामदास ठाकरे (वय 45, रा. जनता कॉलनी), अमोल बाबाराव शिरसाट (वय 35, रा. गोपालनगर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असल्याचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांनी सांगितले. सदर महिला कर्मचारी 17 जानेवारी 1988 ते 29 फेब्रुवारी 2020 या कालावधीत संबंधित संस्थेत टेलिफोन ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. तिला कामाचे सहा हजार रुपये महिन्याप्रमाणे वेतन मिळत होते. तिच्या वेतनातून 1 फेब्रुवारी 2006 पासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नावाने ठराविक रक्कम कपात करण्यात येत होती. परंतु, ही रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमाच केली जात नसल्याचे महिला कर्मचाऱ्यास समजले. त्यांनी यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यानंतर मार्च 2013 ते मार्च 2014 या एक वर्षाचा ईपीएफ निधी संबंधित ऑफीसमध्ये जमा करण्यात आला. त्यानंतर एप्रिल 2014 ते 20 फेब्रुवारी 2020 पर्यंत संस्थेकडून ईपीएफची रक्कमच भरली नाही, असा आरोप महिला कर्मचाऱ्याने तक्रारीत केला. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर सेवानिवृत्तीचे वेतन मिळत नसल्याने आपले जगणे कठीण झाले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 86 हजार रुपयांचा अपहार केला, असेही संबंधित महिलेने तक्रारीत नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितले.
महिला कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल. संस्थेने कुठलाही अपहार केलेला नाही.-श्रीकांत देशपांडे, माजी आमदार, अमरावती.
सदर संस्थेच्या सहा जणांविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे चौकशी सुरू आहे. त्यात चौकशीअंती नियमानुसार योग्य ती कारवाई पोलिसांकडून केली जाईल.-राहुल आठवले, पोलिस निरीक्षक, शहर कोतवाली ठाणे, अमरावती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.