FIR filed against three in destitute fund scam in amravati 
विदर्भ

बापरे! चक्क मृतालाच जीवंत दाखवत हडपले साडेसतरा लाख

संतोष ताकपिरे

अमरावती : संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत शासनातर्फे निराधार महिला व पुरुषांना आर्थिक मदत दिली जाते. परंतु, 2015 पासून ज्या खातेदारांचा मृत्यू झाला, अशा लोकांच्या बनावट स्वाक्षरी, खोटे दस्तऐवज तयार करून बँकेतून तब्बल 17 लाख 62 हजार 693 रुपये तिघांनी हडपल्याची घटना भातकुली येथे उजेडात आली.  

भातकुली पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध फसवणूक, विश्‍वासघात, अपहारप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यापैकी दोघांना अटक झाली असून बँकेचा निलंबित शिपाई फरार आहे. सतीश मोहोड (रा. कावसा), उमेश मानकर (रा. सायत) व अजय जामोदकर (रा. अमरावती), अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी मोहोड व मानकर या दोघांवर मंगळवारी (ता. 15) सायंकाळी गुन्हा दाखल झाल्यानंतर भातकुली पोलिसांनी अटक केली. असे पोलिस निरीक्षक विजयकुमार वाकसे यांनी सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्र, भातकुली शाखा येथे ही घटना उघडकीस आली. पसार असलेला संशयित आरोपी अजय जामोदकर हा याच बँकेत शिपाई म्हणून कार्यरत होता, असे पोलिसांनी सांगितले. बँक प्रशासनाने जामोदकरला निलंबित केले. तिघेही अंशकालीन सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते, असे पोलिसांच्या तक्रारीत नमूद आहे. बँकेच्या वतीने अनिल जनार्दन गिरसावळे यांनी भातकुली पोलिसांत तक्रार नोंदविली. 2015 सालापासूनच हा घोळ आहे.

रेकॉर्डनुसार दर महिन्याला निराधार नागरिकांचे ज्या बँकेमध्ये खाते आहेत तेथे त्यांचे अनुदान जमा होते. भातकुली तालुक्‍याच्या काही गावांतील वृद्ध खातेदारांचा मृत्यू झाला आहे. याची पूर्वकल्पना शासनापर्यंत पोहोचली नाही. त्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले. याची पूर्वकल्पना अंशकालीन कर्मचारी असलेल्या लोकांना होती. बँकेच्या मृत खातेदारांच्या खात्यात लाखो रुपये जमा असल्याचे रेकॉर्ड नमूद तिघांच्या हाती लागले. अस्तित्वात नसलेल्या मृत खातेदारांचे अंगठे व स्वाक्षरी केल्या. त्यावर रिमार्क म्हणून बँक अधिकाऱ्यांच्याही स्वाक्षरी केल्या. भातकुलीच्या बँक ऑफ महाराष्ट्र येथील रोखपाल तपासणी करीत असताना काही स्वाक्षरीबाबत त्यांना संशय आला. त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनात आणून दिले. आधी जामोदकरची चौकशी करून त्याला सेवेतून निलंबित केले. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. भातकुली पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर बँकेच्या व्यवस्थापकांची चौकशी केली. ज्या दस्तऐवजावर रिमार्क आहे तो सहायक व्यवस्थापक यांचा नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. उर्वरित स्वाक्षरीचे नमुने तपासणीसाठी तज्ज्ञांकडे पाठविले जातील. 
-विजयकुमार वाकसे, पोलिस निरीक्षक, भातकुली ठाणे.

हेही वाचा -

मृत लाभार्थ्यांची संख्या 67 -
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ज्या निराधारांचे खाते होते, त्यापैकी 67 मृत खातेदारांच्या खात्यामधून पैसे काढल्या गेल्याचे उघडकीस आले. चौकशीअंती ही संख्या वाढण्याची शक्‍यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT