ralegaon
ralegaon 
विदर्भ

विद्युत स्पार्किंगमुळे आष्टा येथे लागली आग

सकाळवृत्तसेवा

राळेगाव (यवतमाळ) : जिल्ह्यातील राळेगांव येथुन 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या आष्टा येथे विद्युत ताराच्या स्पर्शाने स्पार्किंग होऊन आग लागली. आग गावातील नागरिकांच्या सहकार्याने ही आग आटोक्यात आली.

आष्टा गावालगत 100 फुटावर असलेल्या विद्युत वितरण कंपनीची डीपी असून या डी पी वर स्पार्क होऊन खाली पडलेले विस्तवाचे लोंढे पडून खाली सुकलेल्या गवतांनी पेट घेवून आग  लागली या आगीचा गावाबाहेर धूर दिसू लागल्याने गावातील नागरिकांना या आगीकडे धाव घेऊन गावातील प्रत्येकांनी आपापल्या घरी असलेल्या बोरिंग हँडपम्प वरून पाणी घेऊन आग विझविण्यासाठी एकच धाव घेतली तसेच जानराव गिरी यांना आष्टा येथे आग लागल्याचे कळताच त्यांनी आपला स्वतःचा पाण्याचा टँकर पाठवून  आग विझविण्यास मदत केली.

मात्र, या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. तसेच या आगीची माहिती कळताच महसूल विभागाचे तलाठी गिरीश खडसे, ग्रामसेवक उम्रतकर हे घटनास्थळी पोहचले असून आगीची विचारपूस केली यावेळी गावातील सुनील पारिसे,संजय भोरे,विशाल तोडसे मनोहर बोरवार,तसेच गावातील अनेक नागरिकांनी ही आग विझविण्यास सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT