Fire brigade vehicle caught fire in tivasa Amravati  
विदर्भ

काय सांगता! आग विझविण्यासाठी गेलेल्या अग्निशमनदलाच्या गाडीलाच लागली आग; बंब जळून खाक

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सारसी, सातरगाव रोडवरील असलेल्या वनविभागाच्या जंगलात गेल्या तीन दिवसांपासून आग लागत आहे आजही ही आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने आग विझविण्यासाठी गेलेल्या तिवसा नगरपंचायतची नवीन अग्निशमन दलाची गाडीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

यात नगरपंचायतचे तीन कर्मचारी या आगीत किरकोळ रित्या  जखमी सुद्धा झालेत,तर ही अग्निशमन दलाची गाडी विझविण्यासाठी चांदूररेल्वे येथील गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे,तिवसा येथे जंगलाला आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहे.

वनविभागानेच ही आग लावली होती ती नियंत्रना बाहेर गेल्यानंतर तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाला आग विझविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते तर ही आग अनियंत्रित झाल्याने आग विझविण्यासाठी ही गाडी आली होती मात्र ही आग विझविण्यापूर्वीच तिवसा नगरपंचायतची गाडीच जळून खाक झाली.

यावेळी चांदुर रेल्वे येथील अग्निशमन वाहनाने याठिकाणी पोचवून आगीवर नियंत्रण मिळविले व यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे मदत कार्य केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT