yawatmal
yawatmal 
विदर्भ

यवतमाळ : जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेला आग, दहा वर्षांचे रेकॉर्ड जळून खाक

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेला गुरुवारी (ता. 9) मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीत शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगरशेती विभाग तसेच लेखा व वित्त विभागातील जवळपास 40 संगणक, जुने दस्तऐवज व साहित्य जळून खाक झाले आहेत.  

शहरातील पाचकंदिल चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुख्य शाखा आहे. यात अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनासह संचालकांसाठी प्रतीक्षालय, डाटा सेंटर, वेगवेगळ्या विभागाचा समावेश आहे. मुख्य शाखेला गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर बँकेच्या चौकीदाराला माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ प्रशासकीय अधिकारी, फायर ब्रिगेड यांना माहिती दिली. काही वेळातच सर्व यंत्रणा मुख्य शाखेत पोहोचली. अग्निशमन दलही हजर झाले. त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मुख्य शाखेतील शेती विभाग, बँकिंग विभाग, बिगर शेती विभाग, लेखा व वित्त विभागातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. आगीत चारही विभागातील 40 संगणक, लाकडी व लोखंडी कपाट, फर्निचर या साहित्यासोबत दहा वर्षांचे शेती तसेच बिगर शेती, बँकिंग रेकॉर्ड जळून खाक झाले. आग वरच्या मजल्यावर लागली असून शेतकर्‍यांसंदर्भातील जुने कागदपत्रे असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.

मागील दहा वर्षांपासून बँक ‘सीबीएस’ प्रणाली असल्यामुळे शेतकर्‍यांच्या कर्जमाफी संदर्भातील सगळा डाटा सुस्थितीत असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद देशपांडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. बँकेची पदभरती ऑनलाइन पद्धतीने असल्याने आगीचा कुठलाच परिणाम प्रक्रियेवर झालेला नसल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी देशपांडे यांनी सांगितले. जिल्ह्यात बँकेच्या 95 शाखा आहेत. त्यांच्याकडून होणारे पत्रव्यवहार, त्यांच्या मार्फत दहा वर्षांत जो पत्रव्यवहार करण्यात आला, या कागदपत्रांच्या साहाय्याने जुने रेकॉर्ड पुन्हा गोळा करण्यात येणार आहे. या आगीमध्ये नेमके किती रुपयांचे नुकसान झाले यांचा पंचनामा सुरू आहे. त्यामुळे नुकसानाची आकडेवारी प्राप्त होऊ शकली नाही. 

शॉर्टसर्किटने आग लागण्याची शक्यता
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जुनी आहे. बँकेत शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता मुख्याधिकारी देशपांडे यांनी वर्तविली आहे. त्याचप्रमाणे दहा वर्षांतील रेकॉर्ड जळून खाक झाले तरी बँकेत ’सीबीएस’प्रणालीमुळे हा डाटा रिकव्हर करण्यात येणार असल्याचे अरविंद देशपांडे यांनी सांगितले.

तर्कवितर्कांना उधाण
सहकार खात्याने शासकीय अध्यादेश काढून कुठल्याही सहकारी संस्थेवर केवळ 21 संचालकांची नेमणूक करण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात बँकेतील काही संचालक न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मागील 12 वर्षांपासून या बँकेचे संचालक मंडळाची निवडणूक झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक भाजपची सत्ता येतात भाजपच्या ताब्यात गेली. त्यामुळेच नाबार्डकडून मध्यवर्ती बँकेच्या रिक्त 143 पदाची भरतीला मंजुरात मिळाली आहे. या आगीत बँकेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांसह नोकर भरतीची कागदपत्रे जाळण्यात आली तर नाही ना? अशी चर्चा जिल्हाभरात सुरू आहे.

डाटा सेंटर सुरक्षित
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेला आग लागली असली तरी बँकेचे डाटा सेंटर सुरक्षित आहे. त्यांना कुठलीही हानी झालेली नाही. त्यामुळे खातेदार, शेतकरी यांच्यासह इतर महत्त्वाचे सगळे दस्तऐवज सुरक्षित असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT