fire.jpg 
विदर्भ

तेलाच्या गोदामाला आग; लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

अकोला : स्थानिक एमआयडीसी परिसरातील फेज क्रमांक 4 मधील नारायणी फूल प्रोडक्शन ऑईलच्या गोदामाला सोमवारी (ता. 27) सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अचानक भिषण आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी पोहचले. परंतु आग भिषण असल्याने बंबाच्या 16 पेक्षा अधिक फेऱ्या केल्यानंतर सुद्धा आगीवर नियंत्रणात मिळवता आले नाही. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

स्थानिक महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) फेज क्रमांक 4 मध्ये सुशील पोद्दार व अरुण पोद्दार यांच्या मालकीची नारायणी फूड प्रोडक्शन ऑईल मिल आहे. मिलमध्ये सोयाबीन खाद्य तेल बनवण्यात येते. 15 किलो वजनाच्या पॅकेटमध्ये सदर तेल तयार करुन एमआडसीसी परिसरातीलच ट्रान्सपोर्टनगर जवळील गोदामात ठेवण्यात आले होते. सोमवारी (ता. 27) सकाळी 6 वाजता सदर गोदामात अचानक आग लागली. त्यामुळे जवळच उपस्थित मजुरांसह परिसरात उपस्थित नागरिकांनी आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी पोहचले व आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु सकाळी 11 वाजेपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसना झाल्याची माहिती आहे. आग कोणत्या कारणामुळे लागली यासंबंधी अद्याप माहिती मिळू शकली नाही. 

बंबांच्या 16 पेक्षा अधिक फेऱ्या
गोदामाला लागलेली आग भीषण असल्याने महापालिका अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी पोहचले. परंतु आगीची तीव्रता अधिक असल्याने सकाळी 11 वाजेपर्यंत पाच बंबांनी 16 पेक्षा अधिक फेऱ्या मारल्या व आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आगीवर लवकर नियंत्रण मिळवता आले नाही. 

लाखोंचे खाद्यतेल भस्म
गोदामात लाखो रुपये किंमतीचे सोयबीनचे तेल होते. परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे सदर खाद्यतेल भस्म झाले. याव्यतिरीक्त गोदामातील इतर साहित्य व वस्तु सुद्धा भस्म झाल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT