या अभियानादरम्यान शनिवार (ता. २७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार केला. 
विदर्भ

मोठा अनर्थ टळला! पोलिसांना नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळण्यात यश; गडचिरोलीतील घटना 

मिलिंद उमरे

गडचिरोली : कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मालेवाडा पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील जंगलात नक्षलवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश मिळाले आहे.

या परिसरात नक्षलवादी मोठ्या प्रमाणात एकत्र आले आहेत आणि ते दरवर्षी नक्षल्यांकडून पाळले जात असलेल्या टिसीओसी नक्षल सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर घातपात करण्याची शक्‍यता असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात व अपर पोलिस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानीया यांच्या नेतृत्वात खोब्रामेंढा, हेटाळकसा जंगल परिसरात गडचिरोली पोलिस दलातील सी-६० चे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत होते.

या अभियानादरम्यान शनिवार (ता. २७) सकाळी ७ वाजताच्या सुमारास जंगलात तीन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी सुमारे ६० ते ७० मिनिटे चाललेल्या चकमकीनंतर पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. 

चकमकीनंतर या जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळी ठिकठिकाणी रक्ताचे डाग दिसून आले. त्यावरून या चकमकी दरम्यान एक नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याची शक्‍यता आहे.

घटनास्थळावरून एक ३०३ रायफल मॅग्झीन काडतुसासह, नक्षल पिट्टू, ३ नग प्रेशर कुकर बॉम्ब, नक्षल डांगरी ड्रेस, दोन सोलर प्लेट, वायर बंडल, सुतळी बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात औषध साठा व नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापराचे साहित्य आढळले. यातील ३ नग प्रेशर कुकर बॉम्ब घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. सी-६० कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Hazare Trophy : भारतीय संघात परतला अन् Rinku Singh सूसाट सुटला... १५ चेंडूंत ६८ धावांसह ठोकले वादळी शतक

Kalyan News: धक्कादायक! १७व्या मजल्यावर क्रेन कोसळून मोठी दुर्घटना; एका मजुराचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

त्यांचं शरीर साथ देत नव्हतं... कसे होते इरफान खान यांचे शेवटचे दिवस; डिझायनर म्हणाली, 'कॅन्सर झाल्यानंतर त्यांनी कधीही....

थरारक प्रसंग! आंबेनळी घाटात कार थेट 100 फूट दरीत कोसळली; 10 वर्षांच्या मुलाच्या कॉलमुळे वाचले पाच जणांचे प्राण

Kolhapur Muncipal : महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा; समन्वय ठेवा, नाराजांची समजूत काढा – रविंद्र चव्हाण

SCROLL FOR NEXT