संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

प्रथम केली मदत आणि ‘ते़' कळताच ठोकली धूम

संतोष ताकपिरे

अमरावती : ज्या व्यक्तीला मदतीचा हात देऊन पीडीएमसी रुग्णालयात आणले त्या व्यक्तीला ताप असल्याचे कळताच मदत करणाऱ्यांनी रुग्णालयातून धूम ठोकली. त्यामुळे डॉक्‍टर व तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.


मंगळवारी रात्री आठ ते साडेआठच्या सुमारास एका व्यक्ती तापाने आजारी असल्याने रुग्णालयात येत असताना रस्त्यात पडला. दोन समजूतदार व्यक्तींनी त्याला मदत म्हणून रुग्णालयात आणले. परंतु ज्याला रुग्णालयात आणले ती व्यक्ती काही दिवसांपासून आजारी असल्याचे कळताच मदत करणाऱ्यांनी घाबरून रुग्णालयातून पळ काढला. थोड्या वेळात ज्यावेळी ओपीडीतील डॉक्‍टरांनी रुग्णाची तपासणी केली तेव्हा त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. परंतु जवळ कुणीच नसल्याने डॉक्‍टर व रुग्णालयातील कर्मचारीही घाबरले. घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज रात्रीच तपासले. सकाळीसुद्धा फुटेजची तपासणी सुरूच होती. तेवढ्यात बुधवारी एक महिला चौकशीसाठी पीडीएमसीमध्ये आली. तिने पाहणी केल्यानंतर मृत व्यक्ती तिचा भाऊ असून त्याचे नाव अशोक महादेव उगळे (वय 50, रा. नागपूर), असे असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर त्याला घेऊन येणाऱ्यांचाही शोध लागला. त्यांनी घाबरून असे केल्याचे पोलिसांना सांगितले.

त्याला स्वतःचे कुटुंब नाही
मृत व्यक्तीला स्वत:चे कुटुंब नाही. दहा वर्षांपासून तो गाडगेनगर भागातील एका विधवा महिलेच्या मदतीने राहत होता, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO घनसावंगी तहसील कार्यालयाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT