File photo 
विदर्भ

वडसा रेल्वे स्थानकावर पहिल्यादांच थांबली दरभंगा एक्‍स्प्रेस

सकाळ वृत्तसेवा

देसाईगंज (जि. गडचिरोली) : उत्तर-पूर्व-मध्य रेल्वेने सहा महिन्याच्या प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा रेल्वे स्थानकावर दरभंगा-सिकंदराबाद एक्‍स्प्रेस शनिवारी (ता. 14) थांबली. या एक्‍सप्रेसचा येथे थांबा मिळाला आहे. आता आठवड्यातून दोनदा ही एक्‍स्प्रेस थांबणार असल्याने देसाईगंजच्या वतीने रेल्वेचालकाला पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाजपचे नेते किसन नागदेवे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, पंचायत समिती उपसभापती उईके, भाजपचे तालुकाध्यक्ष राजू जेठानी, नगरसेवक सचिन खरकाटे, दीपक झरकर, शहर महामंत्री सचिन वानखेडे, संतोष श्‍यामदासानी, लक्ष्मण रामानी, अनाजी तुपट, लाला रामटेके, बादल राहटे, आशीष रागवते, पवन तुपट, नानू मेश्राम, वडसा रेल्वे स्टेशन मास्टर संजय कुमार, विष्णू वैरागडे, संजय गणवीर, योगेश नाकतोडे उपस्थित होते. दरभंगा-सिकंदराबाद (17008) ही एक्‍स्प्रेस रेल्वे आठवड्यातून बुधवारी व शनिवारी वडसा रेल्वे स्थानकावर येणार आहे. ही गाडी वेळ दुपारी 12.38 वाजता आगमन व 12.40 वाजता प्रयाण करेल, तर सिकंदराबाद-दरभंगा(17007) ही एक्‍स्प्रेस रविवार व बुधवार वडसा रेल्वे स्थानकावर येणार असून सकाळी 7.17 वाजता येऊन 7.19 ला प्रस्थान करेल, असे वेळापत्रक राहणार आहे. अनेक वर्षांपासून येथे ही एक्‍स्प्रेस थांबावी, अशी मागणी करण्यात येत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT