apaharn 
विदर्भ

पहिली पत्नी आली अन् मुलगा घेऊन गेली...

सकाळ वृत्तसेवा

अकोला : फारकती झालेल्या पहिल्या पत्नीने तिचा नऊ वर्षीय मुलगा शाळेतून कोणाला काहीही न सांगता परस्पर कारमध्ये बसवून नेला. ही घटना मुलाच्या वडिलांना कळताच अकोटफैल पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. मात्र, याप्रकरणी यवतमाळ पोलिसाना संपर्क साधून माहिती देताच ‘त्या’ मुलाला आणि आईला ताब्यात घेण्यात आले आहे.

ऑटोचालकाने दिली माहिती
अकोटफैल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेला तिसरीत शिकणारा मुलगा अकोटरोडवर असलेल्या शाळेत शुक्रवारी सकाळी गेला होता. मात्र, नियमीत वेळेत तो परत न आला नाही. याचवेळी एका ऑटोचालकानी त्या मुलाच्या वडिलाना फोन करून माहिती दिली की, ‘एका महिलेने तुझा मुलगा कारमध्ये बसून नेला आहे. ही माहिती मिळताच अकोटफैल पोलिसांना ठाणे गाठू त्या पालकाने तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपहरणाची नोंदही केली आहे. पोलिसांनी सदर मुलाचा शोध सुरू केला असता मुलाला एका कारमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळाली.

आई व मुलगा यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात
यावरून अकोटफैल पोलिसांनी सदर मुलाच्या वडिलांना अधिक विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, त्यांचा पहिला विवाह 2010 साली झाला होता. मात्र, पहिल्या पत्नीसोबत पटत नसल्याने 2017 मध्ये रितीरिवाजानुसार फारकती झाली होती. तर मुलगा माझ्याकडेच राहणार असा करारही झाला होता. तेव्हा माझ्या मुलाचे माझ्या पहिल्याच पत्नीने अपहरण केले असावे अशी माहिती दिल्यानंतर पोलिसानी पहिली पत्नी यवतमाळ येथील रहिवासी असल्याने अकोटफैल पोलिसांनी यवतमाळमधील पोलिसांशी संपर्क साधून कारचा क्रमांक दिला. यावरून यवतमाळ पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशीरा यवतमाळ रस्त्यावरून सदर कार ताब्यात घेऊन मुलाला व त्याच्या आईला पोलिस ठाण्यात नेल्याची माहिती आहे. शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेले हे अपहरणनाट्य रात्री उशीरापर्यंत सुरू होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT