विदर्भ

वाघाच्या अवयव तस्करीप्रकरणी पाच अटकेत

वनविभागातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने बसस्थानकाजवळ सापळा रचला.

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : वाघाचे दात आणि नखांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने सोमवारी (ता. २३) अटक केली. आरोपी नागभीड तालुक्यातील आहेत. त्यांच्याकडून सहा दात, १८ नखे जप्त करण्यात आली. आरोपींनी नागभीड वनपरिक्षेत्रातील आलेवाहीत क्षेत्रात वाघाची शिकार केली.

याप्रकरणी वनविभागाने ताराचंद महादेव नेवारे (वय २४, रा. खडकाळा), दिनेश नकटू कुंभले (३०, रा. वाढोणा), अजय राजू भानारकर (वय २४, रा. वाढोणा), प्रेमचंद वाघाडे ( वय ५०, रा. सोनापूर तुकूम) आणि राजू कुळमेथे (वय ३८, रा. खडकाळा) यांना अटक करण्यात आली. नागपूर वनविभागाच्या पथकाला उमरेड बसस्थानकाजवळ वाघाच्या दातांची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वनविभागातील दक्षिण उमरेड वनपरिक्षेत्राच्या पथकाने बसस्थानकाजवळ सापळा रचला.

याचदरम्यान काहीजण बसस्थानक परिसरात संशयितस्पद फिरताना आढळून आले. वनविभागाच्या पथकाने आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सहा दात आणि १८ नखे ताब्यात घेतली. अटकेतील आरोपींपैकी राजू कुळमेथे हा संयुक्त वन व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. ताराचंद नेवारे हा पीआरटी सदस्य आहे. वाघाच्या शिकार प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Slab Collapse : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : पिंपरी-चिंचवड येथे मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT