Accident Sakal
विदर्भ

Accident : पंजाब येथील भाविकांवर काळाचा घाला; पाच जणांचा मृत्यू

नागपूर-तुळजापूर महामार्गावर कळंबनजीक अपघात.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - पंजाबवरून नांदेड येथे हजुर साहेब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी जात असताना कळंब तालुक्यातील चापर्डा गावानजीक भाविकांवर काळाने घाला घातला. कारने ट्रकला धडक दिल्याने अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १) पहाटे सहाच्या सुमारास घडली.

अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. सर्वजण पंजाबचे असून मृतांमध्ये तजेंद्रसिंग परविंदर सिंग, बलवीर कौर, भजन कौर, चालक सुराजसिंग यांचा समावेश आहे. जसप्रीत नहाल गंभीर जखमी होत्या, त्यांना उपचारार्थ यवतमाळ येथे हलविण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पंजाब येथील शीख कुटुंब दर्शनाला पीबी ११ सीबी ४९६३ क्रमांकांच्या इनोव्हा कारने नांदेड येथे जात होते. चापर्डा गावानजीक ट्रक (क्रं. एमएच ३२ एजे ७७७२) हा रस्त्याच्या कडेला उभा होता. कारने ट्रकला मागून धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कार ट्रकच्या मागच्या भागात अडकली. चारचाकी वाहनात असलेल्या एअर बॅग्जच्या चिंधड्या झाल्या.

या अपघातातील पाचही जण पंजाब राज्यातील रहिवासी असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिस ठाणेदार दिपमाला भेंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. अपघातातील गंभीर जखमी असलेल्या जसप्रीत नहाल यांना उपचारार्थ यवतमाळ येथे दाखल करण्यात आले होते.

प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले आहे. रात्रभर प्रवास केल्याने चालकाला झोपेची डुलकी असून त्यातून हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी घटनास्थळी भेटून देवून पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT