Five students
Five students 
विदर्भ

विदर्भातील पाच विद्यार्थिनी अडकल्या कझाकिस्तानात; मायदेशी परतण्याची लागली ओढ 

सकाळ वृत्तसेवा

धामणगावरेल्वे (अमरावती)  : वैद्यकीय शिक्षणासाठी कझाकिस्तानात गेलेल्या विदर्भातील पाच विद्यार्थिनी लॉकडाउनमुळे तेथेच अडकल्या असून आता त्यांना मायदेशी येणेही अवघड झाले आहे. धामणगावरेल्वे, मंगरूळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील या विद्यार्थिनी आहेत. 

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने या विद्यार्थिनी गेल्या दोन महिन्यांपासून कझाकिस्तानातच आहेत. त्यांनी कसेबसे दोन महिने काढले, परंतु आता त्यांना जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. विदेशमंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून मायदेशी आणावे, अशी मागणी या विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी केली आहे. 

कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे धामणगाव, मंगरूळ दस्तगीर, वर्धा, बुलडाणा तसेच राज्यभरातील अनेक विद्यार्थी लॉकडाउनमुळे त्याच शहरात आहेत. तेथेसुद्धा लॉकडाउन घोषित केल्यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी वसतिगृह आणि फ्लॅटमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये मणगाव येथील आदिती काळे, मंगरूळ दस्तगीर येथील किरण टेम्पे, बुलडाणा येथील मंजिरी महंत व वर्धा येथील रिया कांबळे, गुंजन बोकडे या विद्यार्थिनींचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थिनी कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हार्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली असून या विद्यार्थिनींना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. 
अनेकदा त्यांचा पालकांशीही संपर्क होत नसल्याने चिंतेत भर पडली आहे. या विद्यार्थिनींच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करावे, त्यांना परत आणावे, अशी मागणी धामणगाव येथील आदिती काळे हिचे वडील डॉ. राजेश काळे यांनी प्रशासनाकडे केली आहे. विदेशमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. 

त्यांचे तिकीट झाले रद्द 

कझाकिस्तान येथून 23 मार्चला भारतात विमानाद्वारे येण्याचे तिकीट आदिती काळे या विद्यार्थिनीने काढले होते. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्यामुळे हे तिकीट रद्द झाले. गेल्या अडीच महिन्यांपासून प्रत्येक दिवस मोजून काढत असून त्यांना घरवापसीची आस आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT