file photo 
विदर्भ

वीज पडून पाचजण गंभीर

सकाळ वृत्तसेवा

धारणी (जि. अमरावती) : शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुमकोट बु. व शिरपूरच्या मध्ये शेतातील झाडाखाली आसरा घेतलेल्या पाच नागरिकांच्या अंगावर वीज पडल्याने ते गंभीर जखमी झाले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेळघाटात मागील 20 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसासोबत कधीकधी वीजसुद्धा कोसळत आहे. मंगळवारी (ता.17) दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाल्याने टिंगऱ्या गावातील नीलेश आरोटकर (वय 29), शैलेश आरोटकर (वय 25) हे दोघे भाऊ शिरपूर येथे मोबाईलच्या टॉवरच्या दुरुस्तीच्या कामाकरिता गेले होते. तेथून धारणीकडे येताना ते शिरपूर व कुसुमकोट बु. च्या मध्ये एका शेतात असलेल्या वृक्षाखाली थांबले.
दरम्यान, टिटंबा येथून ग्रामपंचायतीचे कामकाज आटोपून ग्रामसेवक प्रीतम मावस्कर (वय 30) हे सुद्धा धारणीकडे येत होते. ते सुद्धा त्याच झाडाखाली थांबले. त्यानंतर कासमार येथील पन्नालाल भिलावेकर (वय 50), घुटी येथील विश्वनाथ भारवे (वय. 26) हे दोघेपण धारणीकडे येत असताना ते सुद्धा झाडाखाली थांबले. दुपारी दोन वाजताच्या दरम्यान अचानक पाऊस व विजेच्या कडकडाट झाला. वीज शेतातील झाडावर पडल्याने पाचही नागरिकांना विजेचा झटका बसला. पन्नालाल भिलावेकर यांना पुढील उपचाराकरिता अमरावती येथे पाठविण्यात आले. इतर चार जण धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

SCROLL FOR NEXT