Wardha River flood news
Wardha River flood news  
विदर्भ

यवतमाळ : वणी येथे हजारो नागरिकांचे स्थलांतर

सकाळ वृत्तसेवा

वणी : वर्धा नदीच्या खोऱ्यात पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. शेकडो घरे जमीनदोस्त झाली असून, हजारो हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. पुरामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पूरबाधित गावांतून हजारो नागरिकांना स्थलांतरित करण्याचे कार्य आज बुधवारी तिसऱ्या दिवशीही युद्धस्तरावर सुरू होते.

दोन दिवसांपूर्वी अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात आले. तेव्हापासून निर्माण झालेली पूरपरिस्थिती बिघडली आहे. तालुक्यातील अकरा गावांना पुराने वेढा घातला आहे तर चौदा गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुराची पाहणी केल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. वणीचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, तहसीलदार निखिल धुळधर, संपूर्ण प्रशासन ‘ऑन फिल्ड’ दिसत आहे. पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांच्या मदतीला तीन बोटींसह बचाव पथके परिश्रम घेत आहेत. तालुक्यातील रांगणा, भुरकी, जुनी सावंगी, जुनाड, शेलू खुर्द, झोला, कोना, उकणी अशा अकरा गावांना पुराने वेढा घातला आहे.

कालपर्यंत ९९१ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात बचाव पथकाला यश आले आहे. तर झोला व कोणा येथील नागरिकांना बालाजी आयटीआयमध्ये स्थलांतरित केल्यानंतर त्यांच्या मदतीला शहरातील राजकीय पुढारी, सामाजिक संघटना सरसावल्या आहेत. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हेही स्थितीचा आढावा घेत आहेत. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पुरात अडकलेल्या नागरिकांनी संपर्क करावे, असे आवाहन केले आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया, उमेश पोदार व मित्रमंडळ मदतीसाठी सरसावले आहे. स्थलांतरित नागरिकांना बालाजी आयटीआयमध्ये निवासाची व्यवस्था आपत्ती व्यवस्थापन समितीने केली आहे.

नुकसानाची सद्यःस्थिती

राज्यात पुरामुळे २८ जिल्हे व २८९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. अतिवृष्टीमुळे १०९ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे ४४ घरांचे पूर्णत: तर २०८६ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT