poor 
विदर्भ

हाहाकार! अवघे जीवन पाण्याखाली, बचावकार्यासाठी तेरा बोटी

प्रमोद काकडे

चंद्रपूर : गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सावली, मूल या तालुक्‍यांतील अनेक गावांत पाणी शिरले आहे. या गावांतील नागरिकांच्या घरांचे, शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्‍यातील वैनगंगा नदीकाठावरील लाडज, बेलगाव, कोलारी, भालेश्‍वर, अहेरनवरगाव, पिंपळगाव, चिखलगाव, रणमोचन, खरकाडा, बरडकिन्ही, चिचगाव आणि बेटाळा ही गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. या गावांतील तीन हजार १५६ नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पुरग्रस्तांना गावाबाहेर काढण्यासाठी नव्याने तेरा बोटी मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पुराची स्थिती निर्माण झाली आहे. याचा सर्वात जास्त फटका ब्रह्मपुरी तालुक्‍याला बसला. तालुक्‍यातील लाडज, बेलगाव, कोलारी, भालेश्‍वर, अहेरनवरगाव, पिंपळगाव, चिखलगाव, रणमोचन, खरकाडा यासह अन्य गावांत शनिवारपासून पाणी शिरायला लागले होते. रविवारी ही गावे पूर्णपणे पाण्याखाली आली. वायूदलाचे हेलीकॉप्टर मागवून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू झाले. सोमवारपर्यंत तीन हजार १५९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.

राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या तीन टीमच्या माध्यमातून बचावकार्य सुरू आहे. सोबतच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची चार पथकेही दाखल झाली आहेत. सध्या प्रशासनाने तेरा बोटी मागविल्या आहेत. आणखी वीस बोटींची मागणी करण्यात आली आहे. निर्वासितांसाठी चार ठिकाणी छावण्या उभारण्यात आल्या आहेत. सध्या पाण्याचा विसर्ग कमी झाला असून, काही तासांत पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सावली आणि मूल तालुक्‍यांतील काही गावांनाही पुराचा फटका बसला आहे. मूल तालुक्‍यातील कोरंबी हे गाव पूर्णपणे पुराच्या पाण्याने वेढले आहे. नागरिकांच्या घरातील साहित्याचे व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

संपादन -स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT