Floral showers for the cleaning workers in khamgaon.jpeg 
विदर्भ

अरे वा! पुष्प वर्षाव करत केला सफाई कामगारांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारच्‍या वतीने विविध उपाययोजना आखण्यात आल्‍या आहेत. त्‍याचप्रमाणे स्‍वच्‍छतेबाबत देखील विशेष लक्ष  देण्यात येत आहे व या स्‍वच्‍छतेच्‍या कामात सर्व सफाई कामगार आपल्‍या जीवनाची पर्वा न करता हे स्‍वच्‍छता दुत आपले काम करीत आहेत. त्‍यामुळे  खामगाव येथील नगरसेवक तथा पत्रकार सतीषआप्पा दुडे यांनी आपल्या प्रभागातील सफाई  कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव करून सत्कार करून त्यांना जीवनावश्यक वस्तू भेट दिल्‍या व त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

आज सर्व जग कोरोनाशी लढत आहे कोरोनाला हरवायचे असेल तर स्वच्छता साफसफाई आणि सोशल डिस्टन्सींग हे उपाय महत्त्वाचे मानले गेले आहेत. साफसफाईसाठी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगारांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यतत्पर नगरसेवक सतीशअप्पा दुडे यांनी त्यांच्या प्रभागातील सर्व सफाई कामगारांवर पुष्पांचा उत्सव करतात त्यांचा अभिनव पद्धतीने सत्कार केला.

यावेळी सफाई कामगारांना अन्नधान्य किराणा समाधान मास्‍क आणि सॅनिटायझरचे वाटप देखील करण्यात आले. आमदार आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत हा अभिनव उपक्रम पार पडला. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष अनिता डावरे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष मुन्नाभाऊ पुरवार, जनता पार्टीचे शहराध्यक्ष संजय शिनगारे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस शेखर पुरोहित, वंदेमातरम्‌  मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते दिलीप गुप्ता यांच्यासह नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्‍यांच्‍या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

खरोखरच स्‍तुत्‍य उपक्रम
खामगाव नगर परिषदेचे माजी सभापती सतिषआप्‍पा दुडे व भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित यांनी केलेले काम खरोखरच प्रशंसनिय आहे. सफाई कामगार हे आजच्‍या कोरोनाच्‍या लढ्यातील फायटर्स आहेत. त्‍यामुळे त्‍यांच्‍या प्रति कृतज्ञता व्‍यक्‍त करण्यात आली हा खरोखरच स्‍तुत्‍य उपक्रम आहे.
- आकाश फुंडकर, आमदार खामगाव

त्‍यांच्‍यामुळेच आपला परिसर स्‍वच्‍छ
कोरोनाच्‍या लढ्यात जे सफाई कामगार आपल्‍या जिवावर उदार होवून सफाईचे काम करीत आहेत. त्‍यांच्‍यामुळेच आपला परिसर स्‍वच्‍छ राहतो. अशा कठीण परिस्‍थिती आपणही त्‍यांचे काही देणे लागतो त्‍या हेतुने आम्‍ही आज सर्व सफाई कामगारांना अन्नधान्‍य, मास्‍क व सॅनिटझरचे वाटप केले.
- सतिषआप्‍पा दुडे, नगरसेवक प्रभाग क्र. 6

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 4th T20I: हे काहीतरी वेगळंच! भारत-दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे उशीरा सुरू होणार

Railway News: आता तिकीट कन्फर्म होणार की नाही हे 10 तास आधीच समजणार; वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा

घरी उपाशी आहात की खिचडी खाताय हे... 'आई कुठे...' फेम कांचन आजींनी केली इंडस्ट्रीची पोलखोल; म्हणतात- मराठीत...

Latest Marathi News Live Update : भरचौकात तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार

IPL 2026 Auction: 'खर्च कसा करणार हा...' CSK ने बोली लावलेल्या प्रशांत वीरसाठी रिंकू सिंगसह UP संघातील खेळाडूंचा बसमध्येच जल्लोष

SCROLL FOR NEXT