forest department red soil smuggling in pusad of yavatmal
forest department red soil smuggling in pusad of yavatmal  
विदर्भ

वीटभट्ट्यांसाठी जंगलातील लाल मातीची तस्करी, नागरिकांच्या तक्रारीनंतर उघडले वनविभागाचे डोळे

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) :  तालुक्‍यातील धनसळ, वळसद, काकडदाती येथे सुरू असलेल्या वीटभट्टीसाठी वनविभागाच्या धनसळ-मनसळ जंगलातील लाल मातीची तस्करी करण्यात येत असल्याची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आली होती. त्यानंतर शेंबाळपिंपरी वनपरिक्षेत्राधिकारी सचिन सावंत यांनी तातडीने कारवाई करून वनविभागाच्या लाल मातीसह ट्रॅक्‍टर जप्त करण्यात आला. या कारवाईने वीटभट्टीमालकांचे धाबे दणाणले आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन सावंत यांनी केलेल्या कारवाईत धनसळ येथील शेख चांद शेख इब्राहिम यांच्या वीटभट्टीवर त्यांचा मुलगा शेख नसरूल्लाह हा ट्रॅक्‍टरने (क्रमांक एम एच-29 व्ही 4088) वनविभागाची लाल माती भरून नेताना सोमवारी मध्यरात्री छापा टाकण्यात आला. या कारवाईमुळे वनविभागाच्या मातीची होत असलेली तस्कर स्पष्ट झाली. धनसळ येथील एका जागरूक नागरिकाने वनविभागाच्या जंगलातून लालमातीची होत असलेली चोरी व त्यामुळेच जंगल विभागाचे व पर्यायाने पर्यावरणाचे होणारे नुकसान याबाबत उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक व प्रधान सचिव वनविभाग यांच्याकडे मेलद्वारे तक्रारी नोंदविल्या. धनसळ परिसरातील धनसळ, वळसद व काकडदाती येथील वीटभट्टी यांसाठी ही वनविभागाची लाल माती कुठलीही परवानगी न घेता वापरण्यात येत होती. शेतातील मातीचा परवाना घ्यायचा व लाल माती मात्र, जंगल विभागाची वापरायची, असा हा गैरप्रकार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, वनविभागाचे त्याकडे अजिबात लक्ष नव्हते. 

वन विभागातील माती वीटभट्टीसाठी उकरून काढल्याने वनविभागाच्या जमिनीवरील खडक उघडा पडला असून, मोठे खड्डे तयार झाले आहेत. मातीच उकरून नेल्याने या जंगलात वनस्पती उगवणे कठीण होऊन बसले. त्यामुळे वनविभागाची मोठी हानी होत आहे. दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. अशास्थितीत एका सजग नागरिकाच्या तक्रारींमुळे वनविभागपुरता खडबडून जागा झाला आहे. या तक्रारीमुळे वनविभागाची होत असलेली फसवणूक उघडकीस आली.

अन्‌ तस्करीचे बिंग फुटले! -
वनविभागातील लाल माती ही विटा तयार करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शिवाय ती चोरी करून मिळत असल्याने वीटभट्टीमालकांचे चांगलेच फावलेले होते. हा गैरप्रकार अनेक वर्षांपासून सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर एकाच सजग नागरिकाने तक्रार केल्यानंतर लाल मातीच्या तस्करीचे बिंग फुटले. वनपरिक्षेत्राधिकारी सचिन सावंत व त्यांच्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन रात्र जागून काढत सोमवारच्या मध्यरात्री ही कारवाई केली. जप्त केलेला ट्रॅक्‍टर नागापूर डेपोला जमा करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याचे वनविभागातील सूत्रांनी सांगितले. चौकशीनंतर वनविभागाच्या जमिनीमधून किती माती चोरून नेण्यात आली, ही बाब स्पष्ट होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Ajit Pawar : दत्ता भरणेंचा शिवीगाळ केल्याच्या व्हिडिओ व्हायरल; अजितदादा म्हणतात, हस्तक्षेप केला कारण...

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. यंदाच्या अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT