former forest officer siddharth deore statement on forest department politics in yavatmal 
विदर्भ

'वनविभागात परप्रांतीय अधिकाऱ्यांकडून मराठी अधिकाऱ्यांना सापत्न वागणूक, वनविभागात जंगलराज'

राजकुमार भितकर

यवतमाळ : विनोद शिवकुमार बाला यांचा वन्यजीव हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणाने पापाचा घडा फुटला. वनविभागात वरिष्ठ अधिकार्‍यांचे 'जंगलराज' निर्माण झाले आहे. यावर या घटनेने शिक्कामोर्तब झाले आहे. विशेषकरून मराठी कनिष्ठ अधिकार्‍यांना परप्रांतीय वरिष्ठ अधिकार्‍यांकडून अमानवी वागणूक दिली जात आहे. हा प्रकार अलीकडे अधिकच रूढ होत असल्याचा आरोप सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी सिद्धार्थ देवरे यांनी केला आहे.

सिद्धार्थ देवरे यांनी वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून सेवा केली आहे. त्यांनी अमरावती, अकोला जिल्ह्यात कर्तव्य पार पाडले. सध्या ते सामाजिक कार्यालयात सक्रिय असून वंचित बहुजन आघाडीच्या वाशिम जिल्ह्याचे महासचिव आहेत. परिप्रांतीय अधिकार्‍यांची चालती आहे. जे कनिष्ठ अधिकारी वरिष्ठांची हाजी हाजी करतात, चापलूशी करतात; त्यांचे लाड पुरविले जाते. त्यांना शाबासकी दिली जाते. त्यांच्या गोपनीय अहवालात उत्कृष्ट, अतिउत्कृष्ठ अशा नोंदी केल्या जातात. जे प्रामाणिकपणे शासकीय सेवा करतात; परंतु वरिष्ठांची हाजी हाजी करत नाहीत; त्यांच्या सेवापुस्तिकेत 'प्रतिकूल' शेरे नोंदविण्यात येतात. विनोद शिवकुमारचे हे एक प्रकरण उघड झाले म्हणून समोर आले आहे. असे अनेक विनोद शिवकुमार बाला वनविभागात कार्यरत आहेत. शिवकुमार एक समोर आलेले फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचे ज्वलंत उदाहरण आहे. 'दिसला तर चोर, नाहीतर साव!' अशी परिस्थिती वनविभागात आहे, असे आरोपही त्यांनी केले.

अनेक अधिकार्‍यांनी, अनेक कर्मचार्‍यांना दौर्‍यावर सोबत घेऊन भरउन्हात जंगलात वाहनातून उतरून दिले आहे. अनेकांच्या सुट्ट्या नामंजूर करणे, त्यांना अपमानकारक बोलणे, विनावेतन करणे, असे अनेक रानटी प्रवृत्तीचे विनोद शिवकुमार बाला वनविभागात कार्यरत आहेत. त्यांचा शोध शासनाने एखादी कमिटी बसवून घेतला पाहिजे. आयएफएस लॉबीमध्ये परप्रांतीय व मराठी असा वाद दबक्या आवाजात आजही सुरू असल्याचे दिसतो आहे. त्यामध्ये महाराष्ट्रीयन कनिष्ठ अधिकार्‍यांना वरिष्ठ परप्रांतीय अधिकार्‍यांचा प्रचंड मानसिक त्रास होतो आहे. त्यांची वनविभागात कुचंबणा होताना दिसते आहे. भारतीय संविधानानुसार आयएएस, आयपीएस, आयएफएस किंवा अन्य अधिकारी हे 'लोकसेवक' आहेत. परंतु, हे त्या त्या खात्याचे मालक समजायला लागले आहेत, असेही देवरे म्हणाले.

ही फार वेदनादायक बाब आहे. डीसीएफ, सीसीएफ दर्जाचे अधिकारी यांच्या शासकीय निवासस्थानी अनेक शासनाचे रोजंदारी मजूर, स्त्री-मजूर, वनमजूर व वनरक्षक कार्यरत असतात. त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. संबंधित कर्मचार्‍यांवर शासकीय तिजोरीतून झालेला खर्च, अशा अधिकार्‍यांच्या पगारातून वसूल केला पाहिजे. ते कर्मचारी त्यांचे निवासस्थानातून काढून घेतले पाहिजे. मेळघाट व गडचिरोली यासारख्या अतिदुर्गम भागात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कनिष्ठ व महिला अधिकार्‍यांची पिळवणूक मोठ्याप्रमाणात होताना दिसते आहे. पदाचा गैरवापर केल्याचा ठपकासुद्धा त्यांच्यावर ठेवला पाहिजे. वनविभागातील अनेक वनरक्षक, वनपाल, लिपिक यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून नोकर्‍या सोडून दिल्या आहेत. काहींना हृदयविकाराचे झटके आले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. वरिष्ठांद्वारे होणारी पिळवणूक थांबली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attacks : बिबट्याच्या तावडीत ११ वर्षीय नातू; आजीने दगड-विटांचा मारा करत वाचवला जीव!

Pune News: स्वच्छतेचे नियम धाब्यावर; पुणे जिल्ह्यातील सहा हॉटेलांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित

पश्चिम रेल्वेवर ७५ दिवसांचा वाहतूक ब्लॉक! अनेक लोकल रद्द, काहींच्या मार्गात बदल; मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही फटका

Kolhapur News : ‘तावडे हॉटेल’चे आज ठरणार; पण सगळं गुपित ठेवावे लागणार,वरिष्ठांनी सेवकांना सूचना दिल्याची चर्चा

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये ११ वर्षीय मुलावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT