विदर्भ

विजया धोटे यांच्या घरावर हल्ला; भूखंड ताबा घेण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : गेल्या ४० वर्षांपासून विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात असलेला भूखंड ताब्यात घेण्यासाठी माजी आमदार अ‍ॅड. विजया धोटे यांच्यावर घरी येऊन दोघांनी हल्ला केला. सुमित बाजोरीया, बंटी जयस्वाल यांनी गुंडासह येऊन धुडगूस घातल्याचा आरोप ज्वाला धोटे यांनी बुधवारी (ता. २५) आयोजित पत्रकार परिषदेत केला.

बुधवारी सुमित बाजोरीया व बंटी जयस्वाल हे दोघेही पाच वाहनातून धोटे यांच्या घरी आले. माजी आमदार धोटे यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. घरातील काच फोडून राडा केला. जेसीबीद्वारे भिंत फोडली. माजी खासदार विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले, असा आरोप ज्वाला धोटे यांनी केला आहे.

आमदार, तहसीलदारांना फोन केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही, असे माजी आमदार धोटे यांनी सांगितले. घरात कुणीही नसताना हा प्रकार घडला. आईने माहिती दिल्यावर नागपूरहून यवतमाळला यावे लागले. दोघांनाही तुरुंगात टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा ज्वाला धोटे यांनी दिला. सदर भूखंड बक्षीसपत्राद्वारे मिळाला होता. त्याचे कागदपत्रेही आहेत. या संदर्भात यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याचेही धोटे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार विजया धोटे, लालजी राऊत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

एसआयटीची स्थापना करा

यवतमाळ शहरातील संगठीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी दोघांविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात यावी. भुमाफियांना लगाम लावण्यासाठी एसआयटीची स्थापना करावी, अशी मागणी ज्वाला धोटे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT