Former MP Sadashiv Thakre no more 
विदर्भ

सर्वोदयी नेते सदाशिवराव ठाकरे अनंतात विलीन

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी खासदार सर्वोदयी नेते सदाशिवराव ठाकरे यांच्या पार्थिवावर बुधवारी (ता.10) इंजाळा (ता. घाटंजी) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा माजी जिल्हा सदस्य जितेंद्र ठाकरे यांनी भडाग्नी दिला.

सदाशिवराव ठाकरे यांनी आपल्या 30 वर्षांच्या राजकीय कारर्कीदीत यवतमाळ जिल्हा परिषदेचे दोन वेळा अध्यक्ष, 19 वर्षे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष, यवतमाळ विधानसभेचे आमदार, 1971 ते 1977 पाचव्या लोकसभेत खासदार अशा जबाबदारीच्या पदावरून जनतेच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठविला. त्यांचे वयाच्या 97व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवारी (ता.नऊ) निधन झाले.

त्यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी पालकमंत्री संजय राठोड, नगराध्यक्ष कांचन चौधरी, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, ऍड. शिवाजीराव मोघे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, ख्वाजा बेग, माजी मंत्री आमदार डॉ. अशोक उईके, वसंत पुरके, वामनराव कासावार, मुबंई बाजार समितीचे संचालक प्रवीण देशमुख, संतोष ढवळे, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, मनीष पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती राम देवसरकर, ऍड. आशीष देशमुख, माजी सभापती अरुणा खंडाळकर, बाळासाहेब चौधरी, वसंत घुईखेडकर, प्रकाश मानकर, जिल्हा परिषदेचे सदस्य आशीष लोणकर, अतुल राऊत, अनिल गायकवाड यांनी भेट दिली. इंझाळा येथे जिल्हा प्रशासनाकडून माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तहसीलदार, ठाणेदार उपस्थित होते.

शरद पवार यांनी साधला कुटुंबीयांशी संवाद
माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. ठाकरे यांच्या निधनाचे वृत कळताच शरद पवार यांनी मुलगा जितेंद्र ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत धीर दिला. कॉंग्रेसचे नेते खासदार गुलाब नबी आझाद यांनीही कुटुंबीयांशी संवाद साधत श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT