Four corona patient in Amravati district were cured 
विदर्भ

Video : अहवाल आला अन्‌ टाळ्यांचा गजर झाला; जाताजाता ते म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार कोरोनाबाधित रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्याने शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयात दाखल या चारही रुग्णांचे रिपोर्ट उपचारानंतर निगेटिव्ह आले. ही बाब दिलासा देणारी ठरली आहे. रुग्णालयाचे डॉक्‍टर, पारिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात चौघांना डिस्चार्ज दिला. 

हाथीपुरा परिसरातील एका निधन झालेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाच कुटुंबातील दोन महिला व दोन पुरुषांचा यात समावेश आहे. येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालयात स्थापित करण्यात आले असून, तेथे तज्ज्ञ डॉक्‍टर, पारिचारिका व यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. 

तिथे 14 दिवस या रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी डॉक्‍टर्स, पारिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करीत टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज दिला. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन बऱ्या झालेल्या रुग्णांना शुभेच्छा दिल्या. 

दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी बातमी 
डॉक्‍टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्‍यात घालून अहोरात्र रुग्णसेवा देत आहेत. अमरावती महापालिका हद्दीतील पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील चार जण आज बरे होऊन परतत आहेत, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे. 
- डॉ. निकम

हा आजार बरा होतो

रुग्णालयात सर्व डॉक्‍टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तत्काळ रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या बऱ्या झालेल्या रुग्णांनी यावेळी व्यक्त केली. 

आम्हा सर्वांना आनंद

उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड रुग्णालयात सेवा देणाऱ्या पारिचारिकांनी केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT