file photo
file photo 
विदर्भ

व्यावसायिकाला चार कोटींचा गंडा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर परतावा देण्याचे आमिष दाखवीत शहरातील व्यावसायिकाला चार कोटींचा गंडा घालण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी एकाच कुटुंबातील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी कुटुंबसुद्धा व्यावसायिक आहे. देवेंद्र गोविंद गोयल (34), रितेश गोयल (30), निकिता देवेंद्र गोयल (33), गोविंद मुरारीलाल गोयल (58) आणि अनिता गोविंद गोयल (33) सर्व रा. गोविंद भवन, गोकूळपेठ अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचा टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. या प्रकरणातील तक्रारकर्ते संदीप अग्रवाल (46, रा. देशपांडे ले-आउट, वर्धमाननगर) किराणा व्यवसायी असून, त्यांच्याकडे टायरची एजन्सीसुद्धा आहे. 2018 मध्ये संदीप अग्रवाल कुटुंबीयांसह गोयल यांच्या टूर्स ऍण्ड ट्रॅव्हल्स कंपनीच्या माध्यमातून पर्यटनासाठी दुबईला गेले होते. याच दौऱ्यादरम्यान गोयल कुटुंबीयांनी अग्रवाल कुटुंबीयांसोबत ओळख वाढविली. त्यांच्या व्यवसायाचा व्याप आणि आर्थिक स्थितीचा अंदाज घेतला. यानंतर ते आपल्या कामी येतील यादृष्टीने कौटुंबिक जवळीक साधली. हळूच टूर ऍण्ड ट्रॅव्हल्सच्या व्यवसायात तसेच विदेशी मुद्रा खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणात नफा मिळत असल्याचे सांगितले. त्यासाठी आवश्‍यक असणारे फॉरेन एक्‍स्चेंज लिमिटन्स लायसन्ससुद्धा असल्याचे दाखवून अग्रवाल यांचा विश्‍वास संपादित केला. गुंतवणूक केल्यास वार्षिक तीन टक्के दराने नफा देण्याची तयारी दाखविली. अग्रवाल यांनी त्यांच्यावर विश्‍वास ठेवत वेळोवेळी 4.99 कोटी रुपये आरटीजीएस स्वरूपात आरोपींच्या खात्यात वळते केले. त्यानंतर आरोपींनी 2 कोटी 31 लाख 47 हजार रुपये परतसुद्धा केले. परंतु, मूळ रकमेतील 2 कोटी 67 लाख 52 हजार 856 रुपये आणि नफ्याचे 1 कोटी 23 लाख 19 हजार 365 रुपये अशा एकूण 3 कोटी 90 लाख 72 हजार 221 रुपयांचा अपहार करीत फसवणूक केली. शंका आल्यानंतर अग्रवाल यांनी पैसे परत मागण्यास सुरुवात केली. 14 फेब्रुवारी 2019 पर्यंत पैसे परत न मिळाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT