Four extremist Naxalites surrender to police The prize was Rs 22 lakh 
विदर्भ

चार जहाल नक्षलवाद्यांची पोलिसांपुढे शरणागती; २२ लाखांचे होते बक्षीस

मिलिंद उमरे

गडचिरोली : सरकारची आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षलवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून ४ जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे नुकतीच शरणागती पत्करल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी मंगळवार (ता. २३) पत्रकार परिषदेत दिली. यातील दोघे पती-पत्नी आहेत व या चौघांवरही एकूण २२ लाख रुपये बक्षीस होते.

शरणागत नक्षलवाद्यांमध्ये भामरागड एरिया कमांडर दिनेश उर्फ दयाराम मंगर नैताम (वय २८, रा. पुलकडो, ता. धानोरा), कमांडर नकुल उर्फ सुखालुराम हुमा मडावी (वय ३५. रा. कोहका, छत्तीसगड), कसनसुर दलम सदस्य आणि नकुलची पत्नी नीला रूषी कुमरे (वय ३४, एटावाही, ता. एटापल्ली) आणि झोन टेक्‍निकल दलम सदस्य शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला (वय २६, रा. पुस्टोला ता. कुरखेडा) यांचा समावेश आहे. 

यापैकी दिनेश नैताम याच्यावर २० गुन्हे दाखल असून शासनाने ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. नकुल मडावी याच्यावर १९ गुन्हे दाखल असून ८ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. नीला रूषी कुमरे हिच्यावर १० गुन्हे दाखल असून २ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शरद सामजी आतला याच्यावर ८ गुन्हे दाखल असून त्याच्यावर ४ लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. 

गडचिरोली पोलिस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे २०१९ ते २१ या काळात आजपर्यंत एकूण ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, यात ४ डिव्हीसी, २ दलम कमांडर, २ दलम उपकमांडर, २८ सदस्य, १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलिस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असून जे नक्षलवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास इच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्याची संधी देण्यासाठी गडचिरोली पोलिस दल सर्वतोपरी मदत करेल, अशी माहिती पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT