prashnachinha 
विदर्भ

"त्या' चौघी आंघोळीला गेल्या अन्‌ घडला असा प्रसंग... "प्रश्नचिन्ह'तील घटना 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : नांदगाव खंडेश्वर तालुक्‍यातील मंगरूळ चव्हाळा येथील "प्रश्नचिन्ह' या आदिवासी आश्रमशाळेत शनिवारी एक घटना घडली. शाळेतील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींच्या अंगावर खांब कोसळला. त्यात गंभीर जखमी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला, तर तिघी जखमी झाल्या. भारती संजूलाल बेलसरे (वय नऊ, रा. मोथा, ता. चिखलदरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक ओंकार पवार यांनी सांगितले. 

मंगरूळ चव्हाळा गावात समृद्धी महामार्गाला लागूनच शाळेची इमारत आहे. येथे 237 मुली आणि 250 च्या आसपास मुले शिक्षण घेत आहेत. शेकडो मुले-मुली येथे निवासी स्वरुपात राहतात. सकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास काही मुली आंघोळीकरिता गेल्या होत्या. जेथे मुलींचे स्नानगृह आहे, त्याठिकाणी विटांपासून बनविलेला एक खांब (पिल्लर) आहे. त्यालाच कपडे वाळायला टाकण्यासाठी दोरी बांधलेली आहे. 

अचानक कोसळला विटांचा खांब

अंदाजे आठच्या सुमारास पाचवीत शिकणाऱ्या भारती बेलसरे, वर्षा किसन जामूनकर आणि रुपाली किशोर जामूनकर यांच्यासह सहाव्या वर्गातील दुर्गा साबुलाल भुसूम या चौघी आंघोळ करीत होत्या. अचानक त्याचवेळी विटांचा तो खांब कोसळला. आवाजामुळे काही मुली पळाल्या. त्यातील चौघी जखमी झाल्या. जखमी विद्यार्थिनींना उपचारासाठी नांदगावखंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी भारती बेलसरे हिची प्रकृती गंभीर असल्याने तिला अमरावती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान भारतीचा सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मृत्यू झाला, असे मुख्याध्यापक पवार यांनी सांगितले. मुख्याध्यापकांनी घटनेची माहिती मुलीच्या पालकांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. 

वावटळीमुळे भिंत कोसळली : मतीन भोसले

सकाळी जोरात वारा (वावटळ) सुरू होता. त्यामुळे विटांचा बांधलेला खांब कोसळून ही घटना घडली, असे "प्रश्नचिन्ह' आश्रमशाळेचे प्रमुख मतीन भोसले यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT