four grampanchyat elected by without opposition in amravati 
विदर्भ

अमरावतीत चार ग्रामपंचायती बिनविरोध, इतर ठिकाणी वाढणार रंगत

सुधीर भारती

अमरावती : निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून बहुतांश ठिकाणी निवडणुकीसाठी रंगत वाढण्याची चिन्हे आहेत. अशातच धामणगावरेल्वे तालुक्‍यातील काशिखेड व निंभोरा बोडखा, तर मोर्शी तालुक्‍यातील पाळा व लिहिदा ग्रामपंचायत बिनविरोध झाली. 

धामणगावरेल्वे तालुक्‍यातील काशिखेड ग्रामपंचायतच्या सात जागांसाठी बुधवारी (ता. 30 डिसेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी आठ अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निश्चितच मानले जात होते. त्यानुसार अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारला (ता. चार) मोरेश्‍वर ठाकरे यांनी माघार घेतल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. संपूर्ण काशिखेड गावाने संघटित होऊन आदर्श निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे या ग्रामपंचायतने बिनविरोध निवडीचा आदर्श निर्माण केला आहे. 

धामणगाव तालुक्‍यात 55 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असल्याने त्यात काशिखेड गावाने आदर्श निर्माण करून दुसऱ्यांदा बिनविरोध ग्रामपंचायत केली आहे. गावाची ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी  आजी-माजी पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक आदींनी समन्वयातून पुढाकार घेतला. दरम्यान, बिनविरोध निवडणूक झालेल्या काशिखेड गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये नरेश गावंडे, सविता बगाडे, प्रिया बोंदरे, शारदा ठाकरे, पिंटू आदमाने, उषा कावळे, गोपाल भापकर यांचा समावेश आहे. तसेच निंभोरा बोडखा येथील नवनिर्वाचित झालेल्यांमध्ये अरुण गेडाम, वेणू लांजेवार, प्रवीण बांते, राजू श्रीरामे, सुषमा डुबे, अरुणा दाभाडे, सचिन बमनोटे, सुलक्षणी बढीये, कांचन झेले आदींचा समावेश आहे. या सर्वांचे अभिनंदन केले जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Tank Tower: मोठी घटना! नागपुरात पाण्याच्या टाकीचा टॉवर कोसळला; ३ जणांचा मृत्यू, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Winter Weather Forecast : उत्तर भारतातील थंड हवेची लाट पुन्हा वाढली, अजून गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

SSC CGL Tier 1 Result 2025: SSC CGL टियर 1 परीक्षा 2025 चा निकाल जाहीर; पहा कुठे अन् कसा पाहायचा रिजल्ट

Latest Marathi News Live Update : मुंबई नाशिक महामार्गावर बाईक अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

भारताची जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू स्पर्धेत खेळला; फोटो, व्हिडीओ व्हायरल होताच पाकड्यांचा संताप, खेळाडूवर कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT