Four killed and eight seriously injured in road accident Gadchiroli news 
विदर्भ

भीषण अपघात : होळीच्या दिवशीच चार मजुरांवर काळाचा घाला; ८ गंभीर जखमी

सकाळी वृत्तसेवा

आष्टी (जि. गडचिरोली) : जिल्ह्यातील आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्लीजवळ असलेल्या चंदनखेडी फाट्यावर शिवशाही बस आणि पिकअप या दोन वाहनांमध्ये समोरासमोर धडक झाल्याने चार जण ठार, तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी घडली. मृतांमध्ये पिकअप चालक साईरामकृष्ण सूर्यदेवरा (रा. तलाडा, जि. खम्मम, तेलंगणा), मजूर देवाजी खोकले (रा. आवडगाव, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) हे जागीच ठार झाले, तर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान नैना निकुरे (रा. आवडगाव) व अर्चना आवारी (रा. हडदा, ता. ब्रम्हपुरी) यांचा मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार, तेलंगणा राज्यातून मिरची तोडणाऱ्या मजुरांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीकडे जाणारे पिकअप वाहन आणि प्रवाशांना घेऊन भंडारावरून अहेरीकडे येणारी शिवशाही बस या दोन वाहनांमध्ये चौडमपल्लीजवळील चंदनखेडी फाट्यावर समोरासमोर धडक झाली. पिकअप वाहनात एकूण १७ मजूर होते. ही शिवशाही बस अहेरी डेपोची होती.

खूनप्रकरणात सक्तमजुरीची शिक्षा

चंद्रपूर : घरगुती वादातून सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. दीपक शर्मा असे आरोपीचे नाव आहे. २० जुलै २०१८ रोजी दीपक व शिबू या दोन भावंडात शुल्लक कारणावरून वाद झाला होता. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रागाच्या भरात लहान भाऊ दीपकने मोठा भाऊ शिबू शर्मा याच्यावर कुऱ्हाडीने घाव घातला. यात त्याचा मृत्यू झाला.

घुग्घुस पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक सत्यजित आमले यांनी आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीखंडे यांनी सुनावणीदरम्यान साक्षीदार तपासले. दीपक शर्मा याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व रोख पाच हजार रुपये दंड सुनावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT