file photo
file photo 
विदर्भ

आंबेकरच्या आणखी चार साथीदारांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याची पाच कोटींनी फसवणूक करीत एक कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखेने आणखी चौघांना अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी संतोष आंबेकरसह एकूण आठ जणांना अटक केली आहे. अरविंद पटेल (रा. सुरत), अंकित पटेल (रा. अंकलेश्‍वर), अजय पटेल (रा. मुंबई) आणि सनी ऊर्फ विकास वर्मा (29) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अरविंद, अजय आणि अंकित हे बालाजी फर्मचे मालक आहेत. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी जिगरभाई पटेल (रा. खेडा, गुजरात) यांना भूखंड विक्रीच्या प्रकरणात संतोष आंबेकर व सहकाऱ्यांनी पाच कोटींनी गंडविले होते. भूखंड खरेदी करण्यासाठी जिगरभाई पटेल यांनी अंकलेश्‍वर येथील बालाजी फर्ममार्फत पाच कोटी पाठविले होते. मास्टरमाइंड नाशिकचा रमेश पाटील याने जिगरभाई पटेल यांच्या फोनवरून मालाड येथील बालाजी फर्मला फोन करून पाच कोटी देण्यास सांगितले होते. त्यानुसार फर्मच्या कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील जुही चौधरी आणि पती चंदन चौधरी यांनी पाच कोटी नीलेश केदार यास दिले होते. नीलेशनेच पैशाची विल्हेवाट लावली होती. पाच कोटी घेऊनही आंबेकरने जिगरभाई यांना जागेची विक्री केली नाही. पटेल यांनी चौकशी केली असता मुंबई येथील जागा संतोष आंबेकरच्या मालकीची नसल्याचे लक्षात आले. पटेल यांनी पैसे परत मागितले असता आंबेकरने पैसे परत केले नाही. उलट त्यांना एक कोटीची खंडणी मागितली. त्यावरून शहर पोलिसांनी गुन्हा नोंदवून 12 ऑक्‍टोबरला संतोष आंबेकरला अटक केली. त्यानंतर त्याचा भाचा नीलेश केदार याला अटक केली. 
आरोपींची बुधवारपर्यंत कोठडी 
बालाजी फर्मचे मालक अरविंद पटेल, अंकित पटेल आणि अजय पटेल यांना शहर पोलिसांनी शनिवारी नागपुरात आणले. तिघांनाही अटक करून न्यायालयात रवानगी केली. न्यायालयाने तिघांनाही 23 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
दुसरा भाचा सनीचा प्रताप 
गुजरात येथील व्यापारी हेमंत मोहन पुरोहित यांनाही एक कोटींनी गंडविल्याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी संतोष आंबेकर, रमेश पाटील आणि सनी ऊर्फ विकास वर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. काल रात्री उशिरा पोलिसांनी सनी यास अटक केली. पोलिसांनी त्यालाही न्यायालयात हजर करून 24 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी घेतली. हेमंत पुरोहित प्रकरणात संतोष आंबेकर यास एक कोटीपैकी 70 लाख रुपये मिळाले असून, 30 लाख रुपये कमिशनपोटी बालाजी फर्मच्या मालकाने घेतल्याची माहिती आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT