File photo 
विदर्भ

चौथ्या दिवशीही आंदोलन ; विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : शहराच्या ठिकाणी असलेल्या भाड्याच्या इमारतीतील वसतिगृहाची दैन्यावस्था तत्काळ दूर करण्याच्या मागणीसाठी आदिवासी अपर आयुक्तालयासमोर सलग चौथ्या दिवशी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरूच होते. त्यापैकी दोघांची प्रकृती खालावली. अजय ढंगारे आणि संतोष बढिये या दोन उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी गुरुवारी (ता. 19) दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. आंदोलन सुरू केल्यानंतर एटीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांसोबत विद्यार्थ्यांनी चर्चा केली. परंतु समाधानकारक तोडगा निघाला नाही. त्यामुळे युवक, युवतींच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. 19) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन याप्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी रेटून धरली.
आंदोलनकर्त्यांच्या समर्थनार्थ शहरातील या विभागाच्या वसतिगृहात राहणारे शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी उपोषण मंडपात हजर होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी या विभागाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन तीव्र करण्याचा व अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचा इशारा दिला. यासंदर्भात आदिवासी विभागाचे अपर आयुक्त, उपायुक्त यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT