file photo
file photo 
विदर्भ

2 लाख 69 हजारांनी फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

अमरावती :  महिंद्राच्या ग्रामीण हाउसिंग फायनान्स कंपनीने वाटप केलेल्या कर्जाची वसुली करून 2 लाख 69 हजार 40 रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी लीलाधर रामदास मेश्राम (रा. अंजनवती) यांच्या तक्रारीवरून दत्तापूर ठाण्यात प्रमोद दाभाडे (रा. निंभोरा बोडखा) व रामसागर गायगोले (रा. अमरावती) या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
धामणगावरेल्वे तालुक्‍यातील काही गावांमध्ये वाटलेल्या कर्जाची रक्कम 26 सप्टेंबर 2017 ते 7 ऑक्‍टोबर 2019 या कालावधीत प्रमोद व रामसागर या दोघांनी वसूल केली. ग्राहकांकडून पैसे घेताना त्यांनी बनावट पावत्या दिल्या. वसूल केलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वत:च अपहार करून कंपनीची फसवणूक केली, असा आरोप मेश्राम यांनी दत्तापूर ठाण्यात दाखल तक्रारीतून केला. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झाली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT