doctor
doctor 
विदर्भ

बोगस डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आपले "स्वागत" आहे... काय त्रास होतोय?

सकाळवृत्तसेवा

अंदोरी, देवळी (जि. वर्धा)  : वैद्यकीय पदवी नसताना अंदोरी येथे "स्वागत" क्‍लिनिक नावाने खासगी रुग्णालय चालविणाऱ्या विलास नांदे याला देवळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. बोगस डॉक्‍टर शोध समितीच्या छाप्यात त्याच्याकडील पदवी बोगस असल्याचे आढळून आले होते. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांनी पोलिसात लेखी तक्रार नोंदविली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. 

विलास नांदे यांच्याकडे ऍलोपॅथिक वा होमिओपॅथिक पदवी नसल्याची बाब अंदोरी येथील काही नागरिकांच्या लक्षात आली होती. याबाबत नागरिकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण धमाने यांच्याकडे केली होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून हे प्रकरण मागे पडत होते. याविषयी नागरिकांच्या तक्रारी सुरूच होत्या. या बोगस डॉक्‍टरविषयी प्रसार माध्यमात वृत्तही प्रकाशित झाले. त्यानंतर डॉ. प्रवीण धमाने यांनी देवळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणाची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडेही करण्यात आली. 

ऍलोपॅथिक औषधीसाठा, बनावट पदवी आढळली
या घटनाक्रमानंतर डॉ. धमाने यांनी बोगस डॉक्‍टर शोध समितीसोबत विलास नांदे याच्या घर व क्‍लिनिकवर छापा घातला. या छाप्यात तो वापरत असलेला ऍलोपॅथिक औषधीसाठा व महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे नोंद नसलेली पदवी आढळून आली. कोणतीही वैद्यकीय पदवी उत्तीर्ण न करताच विलास नांदे हा वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निष्पन्न झाले.

राष्ट्रवादीचे प्रवक्‍ते संतापले; म्हणाले, आमदार कृष्णा खोपडे यांचे मानसिक संतुलन बिघडले
 

विलास नांदे या बोगस पदवीचा शिक्का वापरत असल्याचेही पुढे आले. या आधारावर वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अन्वये विलास नांदे याच्याविरुद्ध डॉ. प्रवीण धमाने यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली. ठाणेदार नितीन लव्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे पुढील तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT