doctor 
विदर्भ

विदर्भातील या जिल्ह्यात डॉक्टर विकत होता कोरोनाची लस...मग

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : कोरोना लस व गुद्‌द्‌वार कर्करोगाची भीती दाखवून उपचाराच्या नावाखाली बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या वैद्यकीय व्यवसायाचा भंडाफोड करण्यात आला. जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्‍टरविरुद्ध वसंतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 

परिमल चित्तरंजन मुजुमदार उर्फ बंगाली (वय 40, रा. वसंतनगर) असे बोगस डॉक्‍टरचे नाव आहे. जनमानसात सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खासगी दवाखाने बंद असल्याचा फायदा बोगस डॉक्‍टरकडून घेतला जात होता. या प्रकरणाची चौकशी जिल्हा शल्यचिकित्स्कांनी केली. परिमल मुजुमदार हा कोरोना लस विक्रीसह गुद्‌द्‌वाराच्या कर्करोगाच्या उपचारासाठी गरजूंकडून तीस ते चाळीस हजार रुपये उकळत होता. विशेष म्हणजे त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाची कोणतीही पदवी नाही.

बंगाली डॉक्‍टरविरुद्ध गुन्हा 
राजरोसपणे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून रुग्णांवर उपचार सुरू होते. ग्रामीण व शहरी भागातील लोकांच्या आरोग्याशी एकप्रकारे त्याने खेळच चालविला होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक यांनी वसंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून परिमल मुजुमदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिवांच्या तोंडाला काळे फासले, अध्यक्षांनाही इशारा

Kannad News: खिचडी खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडली; दोन चिमुकल्या भावा-बहिणींचा उपचारादरम्यान मृत्यू

Ganeshotsav news: चिंचवडगावात गणेशोत्सवाची धामधूम; जिवंत देखावे, ‘स्पेस गॅलेक्सी’ संकल्पनेतून सामाजिक संदेश .

Latest Marathi News Live Update : MPSC सचिवांना काळं फासलं, संभाजी ब्रिगेडकडून आक्रमक भूमिका

Marbat Festival 2026: काळी मारबत, पिवळी मारबत… नागपूरचा ‘मारबत उत्सव’ नेमका काय आहे?

SCROLL FOR NEXT