File photo 
विदर्भ

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : भारतीय स्टेट बॅंकेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना 10 लाख 40 हजार रुपयांनी गंडा घालण्यात आला. तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करून पर्दाफाश करण्यात आला. येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (ता.30) ही कारवाई केली. अंकुश कावलकर (रा. अमरावती), रमेश गिरी (रा. मादणी, ता. आर्वी, जि. वर्धा), वैभव देशमुख (रा. अमरावती) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. उत्तम रामचरण इंगोले (रा. दिग्रस) यांचा मुलगा कुशल इंगोले याला कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, म्हणून दहा लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. रक्कम स्वीकारून त्याला भारतीय स्टेट बॅंक मानकापूर, नागपूर येथील नियुक्ती आदेश देण्यात आले. त्यावर तक्रारदार हे नागपूर येथे रुजू होण्यासाठी गेल्यावर त्यांना नियुक्ती आदेश बनावट असल्याचे व बॅंकेने अशा कोणत्याही प्रकारची नियुक्ती आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज सादर केला होता. त्यावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अर्जाची चौकशी सुरू केली. यामध्ये आरोपींनी वडगाव येथील रहिवासी नरेश निमजे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मुलगा विशाल, कांता पांडे (रा. सह्याद्री सोसायटी) यांची मुलगी प्रांजली यांना वनविभाग व इतर ठिकाणी कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रकमा उकळल्याचे चौकशीत समोर आले. त्यावरून आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी यवतमाळ येथील अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक नुरुल हसन, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुलकुमार राऊत व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अमरावतीमध्येही गुन्हा नोंद
या टोळीने बेरोजगारांना व त्यांच्या घरच्यांशी संबंध प्रस्थापित करून त्यांना विश्वासात घेतले. अनेक लोकांना शासकीय नोकरीवर लावले, असे सांगून त्यांना नियुक्तीचे आदेश दाखवून विश्वास संपादन केला. या प्रकरणातील संशयित आरोपींवर अमरावती येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT