अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार 3 मेपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. परंतु जिल्ह्याचा समावेश ऑरेंज झोनमध्ये असल्याने ठराविक क्षेत्रांना मर्यादित कालावधीसाठी सुरू ठेवण्यास मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी (ता. 19) दिले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव असलेल्या व प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या भागात मात्र कोणतीही मुभा असणार नाही. त्यामुळे गत् 26 दिवसांपासून लॉक असलेले उद्योग, मोजके व्यवसाय सोमवार (ता. 21) पासून सुरु होतील.
जिल्ह्यातील या सेवांना सशर्त परवानगी
- सर्व आरोग्य सेवा : रुग्णालये, नर्सिंग होम, क्लीनिक, टेलीमेडीसिन सुविधा, वैद्यकीय प्रयोगशाळा, आणि संग्रह केंद्र, औषध व वैद्यकीय प्रयोगशाळा, पशु वैद्यकीय रुग्णालये, दवाखाने, क्लिनीक, पॅथोलॉजी, औषधी विक्री व पुरवठा.
कृषी व कृषी संबधित सेवा : शेती व फळबागा संबंधातील सर्व कामे, शेतामध्ये शेतकरी व शेतमजूर यांना शेतीविषयक कामे, कृषी उत्पादने खरेदी करणाऱ्या यंत्रणा तसेच शेतमालांची उद्योगाद्वारे, शेतकऱ्यांद्वारे व शेतकरी गटांद्वारे किंवा शासनाद्वारे होणारे थेट विपणन हमी भावाने खरेदी करणाऱ्या यंत्रणांची कामे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या मंडी किंवा महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केलेल्या मंडी, शेतीविषयक यंत्राची व त्यांचे सुटे भागाची विक्री व दुरुस्ती करणारे दुकाने, शेती करीता उपयोगात येणारे भाडेतत्वावरील अवजारे पुरवठा करणारे सेंटर्स, रासायनिक खते, कीटकनाशके व बी-बियाणे यांचे उत्पादन वितरण व किरकोळ विक्री, शेतमालाची काढणी व पेरणी करणारी यंत्रे व त्यांची राज्यांतर्गत व आंतरराज्य वाहतूक.
- मासेमारी ः मासेमारी व अनुषांगिक व्यवसायाकरिता वाहतुकीची मुभा.
पशुवैद्यकीय व संबंधित सेवा ः दूध संकलन, प्रक्रिया, वितरण व विक्री, फरसाण व स्वीटमार्ट (दुकानावरुन घेऊन जाणे अथवा पार्सल डिलिव्हरी इत्यादी कामे सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत तसेच सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत), पशुपालन, कुकुटपालन व अनुषंगिक कामे, जनावरांच्या छावण्या व गोशाळा.
- आर्थिक बाबींशी संबंधित ः बॅंका, ए.टी.एम. बॅंकेसाठी आवश्यक आयटीसेवा, बॅंकींग संवादक, प्रतिनिधी सेवा इत्यादी बॅंकींग सेवा सुरू राहतील. बॅंकाना नेमून दिलेल्या वेळेनुसार बॅंक शाखा सुरू राहतील.
- मनरेगा मधून द्यावयाची कामे ः मनरेगाच्या कामात सिंचन व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, पाटबंधारे आणि जलसंधारण क्षेत्रातील इतर केंद्र आणि राज्य योजनांनाही मनरेगा कामांशी सांगड घालून अंमलबजावणी करण्यास मुभा राहिल.
- सार्वजनिक उपक्रम ः पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस यांची वाहतूक वितरण, साठवण व विक्री, पोस्ट ऑफीस संबधित सर्व सेवा, पाणी, स्वच्छता, घन कचरा व्यवस्थापना बाबतची कार्यवाही, टँकरने पाणीपुरवठा आणि वाहनांच्या चारा पुरवठ्यासह नैसर्गिक आपत्तींशी संबंधित विशेषत: टंचाई, दुष्काळ या सर्व उपाययोजना सुरू राहतील.
- माल वाहतुकीबाबत ः वाहतूक करणारे ट्रक त्यासोबत दोन वाहन चालक व एक मदतनीस असावा. माल वाहतुकीसाठी जाणारे खाली ट्रक किंवा मालवाहतूक करून परत जाणारे ट्रक यांना सुद्धा परवानगी राहिल.
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ः जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यामधील सर्व सुविधा. जीवनावश्यक वस्तू विकणारे प्रतिष्ठान धान्य व किराणा, बेकरी, फळे व भाज्या, कृषी संबंधित सर्व दुकाने, पेट्रोल पंप, दुधाची दुकाने, अंडे, मास, मच्छी, पशुखाद्य व त्यांचा चारा विक्रीची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहतील.
- व्यापारी आस्थापना ः प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिटीएच व केबल वाहीनी, माहिती व तंत्रज्ञानाच्या सेवा ५० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू राहतील. सेवा देणाऱ्या व्यक्ती जसे इलेक्ट्रीशियन, संगणक, मोबाईल दुरस्ती, वाहन दुरुस्त करणारे केंद्र, नळ कारागीर, सुतार यांच्या सेवा सुरू राहतील. एमएसएमई अंतर्गत गव्हाचे पीठ, डाळी आणि खाद्यतेल इ. उत्पादन करणाऱ्या संस्था.
- उद्योग-औद्योगिक, आस्थापना(शासकीय व खासगी) ः नगर परिषद हद्दीबाहेरील व ग्रामीण भागातील उद्योग. औद्योगिक आस्थापनामध्ये कामगारांना कामाचे ठिकाणी पोहचविण्याची व्यवस्था सामाजिक अंतराच्या नियमाची अंमलबजावणी करुन कंत्राटदाराने करावी किंवा त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करावी. नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण भागातील विटभट्टी.
- बांधकाम क्षेत्र ः नगरपरिषद-नगरपंचायत क्षेत्राबाहेरील व ग्रामीण क्षेत्रातील रस्ते, सिंचन प्रकल्प, इमारतींचे बांधकाम तसेच सर्व प्रकारचे औद्योगिक प्रकल्पाचे बांधकाम सुरू राहतील. नगर परिषद-नगरपंचायत हद्दीतील सुरू असलेली बांधकामे जेथे मजूर उपलब्ध आहे व बाहेरून मजूर आणण्याची गरज पडणार नाही अशी कामे सुरू राहतील. मॉन्सून पूर्व संबंधित सर्व कामे.
- व्यक्तींचे आवागमन : आपत्कालीन सेवांसाठी वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय सेवा आणि आवश्यक वस्तू खरेदीसाठी खासगी वाहने अशा परिस्थितीत चारचाकी वाहनांच्या बाबतीत खासगी वाहनचालका व्यतिरिक्त एका प्रवाशाला परवानगी दिली जाऊ शकते, मात्र दुचाकी वाहनांच्या बाबतीत केवळ वाहनचालकास परवानगी असेल. जिल्हा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार कामाच्या ठिकाणी जाणारे व कामावरून येणारे सर्व कर्मचारी. संबंधित कार्यालय प्रमुखाने कर्मचाऱ्यास आदेश व पासेस निर्गमित करावे.
- केंद्र शासनाची कार्यालये ः आरोग्य व कुटुंब कल्याण, आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा सूचना व विज्ञान केंद्र, एन.सी.सी., नेहरु युवा केंद्र.
- राज्य शासनाची कार्यालये ः पोलिस, होमगार्ड, अग्निशमन, आपतकालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृहे आणि नगर पालिका, नगर पंचायत. राज्य शासनाचे इतर खात्यांचे वर्ग ‘अ’ व वर्ग ‘ब’चे अधिकारी आवश्यकतेनुसार कार्यालयात उपस्थित राहतील तसेच गट ‘क’ कर्मचारी यांची 10 टक्के उपस्थितीसह कार्यालये सुरू राहतील. जिल्हा प्रशासन व कोषागार कार्यालये कमी कर्मचारी संख्येने सुरू राहतील. वन कार्यालये कर्मचारी, प्राणीसंग्रहालय, रोपवाटिका, वन्यजीव, जंगलातील वणवा व आग नियंत्रण करणारी यंत्रणा, वृक्षारोपण, गस्त घालणे इत्यादी कामे.
- हॉटस्पॉट व कंटेनमेंट झोनसाठी सूचना ः ज्या क्षेत्रामध्ये कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे अशा हॉटस्पॉट क्षेत्रात किंवा लक्षणीय प्रसार झाला आहे, अशा क्लस्टर क्षेत्रात प्रवेश करणे व त्याच्या बाहेर येण्यास मनाई कायम आहे. अशा परिसरामध्ये आपातकालीन अत्यावश्यक सेवा (वैद्यकीय अत्यावश्यक सेवा, कायदा व सुव्यवस्थेशी निगडीत सेवा) वगळता इतर कोणतीही व्यक्ती आत किंवा बाहेर जाणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.