file photo 
विदर्भ

काय सांगता! वाघिणीने बछड्यांसह रस्त्याने मारला फेरफटका...वाचा सविस्तर

साईनाथ सोनटक्के

मूल (जि. चंद्रपूर) : येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रान तलाव आणि डोनी फाट्याजवळ पुन्हा एकदा वाघिणीने आपल्या बछड्यांसह एन्ट्री मारली. रस्त्यावर वाघीण आपल्या बछड्यांसह फिरत असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तिला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मात्र वाघिणीने बछड्यांसह जंगलाची वाट धरली.

वाघीण आपल्या बछड्यांसह रस्त्याकाठाने फिरत असतानाची माहिती अनेकांना मिळाली. मूल-चंद्रपूर या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांनीसुद्धा गर्दी करून वाघिणीला पाहण्याचा उत्साह दाखविला. लोकांच्या आणि वाहनचालकांच्या गर्दीमुळे वाघीण आणि बछड्यांची ताटातूट झाली. एकीकडे वाघीण आणि दुसरीकडे बछडे अशी अवस्था झाल्याचे समजताच वनविभागाच्या टायगर फोर्सने डोनी फाट्याजवळ धाव घेऊन तेथील गर्दी कमी केली.

वन्यजीवांचा मोठ्याप्रमाणात मुक्तसंचार

वनविभागाचे कर्मचारी ढोले, वन्यजीव अभ्यासक उमेशसिंह झिरे यांनीही भेट देऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला. मागील आठवडाभरापासून वाघीण आणि तिचे बछडे या परिसरात फिरत आहेत. डोनी फाटा आणि रानतलाव हा वन्यजीवांसाठी अतिशय सुरक्षित असा परिसर असल्याने या भागात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात मुक्तसंचार आहे.

वाहनचालकांनी रस्त्यावर गर्दी करू नये

रान तलाव असल्यामुळे पाणी पिण्यासाठी वन्यजीव रस्ता ओलांडून या तलावाकडे जात असतात. या परिसरात बऱ्याच वाहनचालकांना पट्टेदार वाघांसह वन्यजीवांचे दर्शन झाले आहे. आता तर वाघीण आपल्या बछड्यांना घेऊन परिसरात फिरत असल्याने लोकांच्या उत्साहात आणखीनच भर पडली आहे. वन्यजीवांचा हा परिसर असल्याने नागरिकांनी आणि वाहनचालकांनी या भागात गर्दी करू नये, वन्यजीवांना मुक्त संचार करू द्यावा, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT