fish 
विदर्भ

विक्रीसाठी आली ताजी मासोळी अन् अवघ्या तासाभरात झाली फुर्रर्र...

नीलेश झाडे

गोंडपिंपरी (जि. चंद्रपूर)  : लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गावातील किराणा दुकान, भाजीपाला दैनंदिन बाजार सुरू आहेत. मटण, चिकन सेंटर बंद असल्याने खवय्यांची घालमेल सुरू आहे. अशात गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे तलावातील मासोळी विक्रीसाठी आली. अवघ्या तासाभरात दोन क्लिंटल मासोळी संपली. विशेष म्हणजे मासोळी खरेदी करताना सोशल डिस्टंन्स ग्राहक पाळत होते.

कोरोनाने देशाला टाळेबंद केले. जिल्ह्याचा सीमा बंद आहेत. घराबाहेर न पडण्याचा सूचना प्रशासन करीत आहे. किराणा,भाजीपाला, मेडिकल दुकाने वगळता बाकी दुकाने बंद आहेत. गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथील चिकन सेंटर बंद आहेत. तर मटणाची खरेदी करण्यासाठी तालुका गाठावे लागते. बाहेर निघाले की पोलिस दादा प्रसाद द्यायला टपून बसलेले. अशात मांसाहार करणाऱ्यांची चांगलीच घालमेल होताना दिसते आहे.

दुपारी डोंगरगाव तलावातील जवळपास अडीच क्लिंटल मासोळी गावात विक्रीसाठी आली. ग्राहकांची गर्दी टाळण्यासाठी सात-ते आठ जण वेगवेगळ्या वाँर्डात मासोळी विक्रीसाठी गेले. मासोळी आली याची माहिती मिळताच खवय्यांनी गर्दी केली. अवघ्या एका तासात मासोळी संपली. सोशल डिस्टन्स पाळत मासोळी खरेदी सुरू होती. त्यामुळे अनेकांचे हात रितेच राहिले.

सोशल मीडियावर आठवले स्टाईलची धूम, हे आहे कारण...

तलावातच दुकान थाटले
चिकन खाल्ल्याने कोरोना होतो, अशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे चिकनकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. मासोळ्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव तलावात मच्छीपालन सुरू आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता तलावात ठाण मांडून विक्री सुरूआहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT