MP Ashok nete vehicle Accident Sakal
विदर्भ

Gadchiroli Accident : खासदारांच्या वाहनाला टिप्परची धडक; सीटबेल्ट व एअरबॅगमुळे थोडक्यात वाचले प्राण

गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली.

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. मात्र, ‘सीटबेल्ट’चा वापर केल्याने आणि वेळीच ‘एअरबॅग’ उघडल्याने खासदार नेते, चालक व सुरक्षारक्षकांचे प्राण वाचले आहेत. शनिवार (ता. ४) सकाळी नागपूरजवळील विहिरीगाव जवळ हा अपघात घडला.

खासदार अशोक नेते ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व टिप्परची त्यांच्या वाहनाची समोरासमोर जोराची धडक झाली. खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते.

खासदार नेते हे समोरच्या सीटवर होते. धडक बसताच त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवासी सुखरूप बचावले. यानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान क्षतिग्रस्त वाहन तिथेच सोडून खासदार नेते हे सहकाऱ्यांसह दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीला पोहोचले.

दरम्यान खासदार नेते यांना विचारणा केली असता त्यांनी आपण सीटबेल्ट व एअरबॅगमुळे थोडक्यात बचावलो असून सुखरूप आहोत. कार्यकर्त्यांनी अजिबात काळजी करू नये असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT