ST Bus Video Viral Sakal
विदर्भ

पहावे ते नवलच! चक्क लालपरीला फुटले पंख; छप्पर उडालेल्या एसटी बसचा Video Viral

गडचिरोलीतील अहेरी आगाराची बस, व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : छप्पर उडालेल्या एसटी बसचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या बसचे छत तुटलेले असून ही बस सुसाट वेगाने जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराची ही बस असून हा व्हिडिओ गडचिरोली - अहेरी या मार्गावरील असल्याची माहिती समोर आली आहे. छप्पर उडालेलं असतानाही ही बस भरधाव वेगाने धावत आहे. तर समोर असलेल्या वाहनातील एका प्रवाशाने या बसचा व्हिडिओ शूट केला आहे.

दरम्यान, राज्यभर छत गळणारी, प्रत्येक सुटा भाग वाजत असणारी, ब्रेक फेल झालेली, खिळखिळी झालेली अशा अनेक एसटी बसेस चे दर्शन प्रवाशांना वेळोवेळी होत असते. मात्र दुर्गम भागातील एसटी बसेसच्या वाईट स्थितीचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ मात्र भलताच वायरल होत आहे. "आता लालपरीलाही फुटलेत पंख" अशा भन्नाट कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

ही बस दुरूस्तीसाठी जात असून यामध्ये एकही प्रवाशी प्रवास करत नसल्याची माहिती काही नेटकऱ्यांकडून देण्यात आली आहे. अनेकदा बसचा अपघात झाल्यानंतर किंवा बिघाड झाल्यानंतर अशा प्रकारचे नुकसान होत असते. या बसचेही अशाच प्रकारचे नुकसान झाल्याची शक्यता नेटकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT