Voters sakal
विदर्भ

Loksabha Election Voting : रणरणत्या उन्हात ट्रॅक्टरने, पायी प्रवास करून बजावला मतदानाचा हक्क

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कडेकोट पोलिस बंदोबस्तात शुक्रवार (ता. १९) मतदान प्रक्रिया पार पडली.

मिलिंद उमरे

गडचिरोली - गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कडेकोट पोलिस बंदोबस्तात शुक्रवार (ता. १९) मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, १३ गावांसाठी कोटमी गावात एकमेव मतदान केंद्र बांधण्यात आल्याने अनेकांना पायी तर काहींना ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे केंद्र गाठावे लागले.

स्थानिक मतदारांच्या म्हणण्यानुसार, गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक अशा पद्धतीने पायीच मतदान करत आहेत. मताधिक्याने विजयी होऊनही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मतदानासाठी मूलभूत सुविधा न दिल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली. दैनिक सकाळ जिल्हा बातमीदाराने शुक्रवारी जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांचा आढावा घेतला.

यामध्ये संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोहोचून सुविधांचा आढावा घेण्यात आला. एटापल्ली तालुक्यातील कोटमी हे गाव घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात वसलेले आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा निवडणूक विभागाने मतदान केंद्र उभारले आहे.

या मतदान केंद्रासह कोटमी, नैनगुडा, अडांगे, कोटमी क्र. १, आसवंडी, झुरी, कोंडवाही, इटावाही, नवेगाव, वसमतटोला, पायडी, गदेरी, इरफागट्टा आणि बिद्री आदी गावांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व गावांपासून कोटमी मतदान केंद्राचे अंतर ५ किलोमीटरहून अधिक आहे. जिल्हा निवडणूक विभागाच्या नियोजनानुसार लांब पल्ल्याच्या गावांतील लोकांना ये-जा करण्यासाठी एसटी बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मात्र वरील सर्व गावातील लोकांनी शुक्रवारी पायी प्रवास करून मतदान केले. काही गावांच्या ग्रामसभांनी त्यांच्या स्तरावर ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्याच्या मदतीने नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचता आले. या मतदान केंद्रावर १३८४ मतदार मतदान करणार होते.

सुरपाम यांनी बजावली महत्त्वाची भूमिका...

कोटमी परिसर पूर्णपणे आदिवासीबहुल आहे. येथील वृद्ध महिलांना अजूनही मराठी भाषेचे ज्ञान नाही. गोंडी भाषा ही त्यांची मुख्य बोलीभाषा आहे. अशा स्थितीत मतदान केंद्रावर पोहोचलेल्या बहुतांश महिलांना काय करावे हेच कळत नव्हते. ही बाब लक्षात घेत कोटमी केंद्राचे प्रादेशिक अधिकारी आणि सिरोंचाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर सुरपाम यांनी सर्व मतदारांना गोंडी भाषेत ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपीएटी मशीनची माहिती दिली आणि लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले.

वडीलांवर अंत्यसंस्कार करून जिल्हाधिकारी कर्तव्यावर...

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय दैने यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. दरम्यान दैने यांच्या वडीलांचे १५ एप्रिल रोजी दु:खद निधन झाले. वडीलांच्या निधनाचे दु:ख काळजात दफन करत अंत्यसंस्कार पूर्ण करून जिल्हाधिकारी दैने १७ एप्रिल रोजी तातडीने निवडणुकीच्या राष्ट्रीय कर्तव्यावर हजर झाले होते. त्यांनी शुक्रवारी गडचिरोली येथे मतदान करून मतदानाचे कर्तव्य पार पाडून वडिलांना श्रद्धांजली वाहत असल्याची प्रतिक्रिया दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT