Gadchiroli crime news sakal
विदर्भ

प्रियकराच्या मदतीने मुलीनेच केला आईचा खून

अहेरी जुन्या तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात शुक्रवार सकाळी घटना उघडकीस आली

सकाळ वृत्तसेवा

अहेरी : प्रियकराच्या मदतीने आपल्या जन्मदात्या आईचा खून मुलीने केल्याची खळबळजनक घटना अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात शुक्रवार सकाळी उघडकीस आली आहे. मृत महिलेचे नाव निर्मला आत्राम (वय ४९) असून आरोपी असलेल्या तिच्या मुलीचे नाव उर्मिला चंद्रकांत आत्राम (वय २२) व आरोपी प्रियकराचे नाव रूपेश येनगंधलवार (वय २२), असे आहे.

अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री पोलिस अधिकारी, कर्मचारी गस्त घालत असताना आरोपी ऊर्मिला व तिचा प्रियकर रूपेश रस्त्याने ये-जा करताना दिसले. पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी उर्मिला व रूपेशला उर्मिलाच्या घरी नेले. घरात पोलिसांनी बघितले असताना उर्मिलाची आई निर्मला मृतावस्थेत आढळून आली. तिचा खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी उर्मिला व तिचा प्रियकर रूपेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. दोघांनीही सर्व घटनाक्रम सांगितला. विशेष म्हणजे उर्मिलाचे वडील चंद्रकांत आत्राम पोलिस दलात कार्यरत होते. २० वर्षांपूर्वी नक्षलवाद्यांनी त्यांचा खून केला होता.

त्यानंतर आई निर्मलानेच उर्मिलाचे पालन पोषण केले. पुढे उर्मिलाचे रूपेश येनगंधलवारसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. हे प्रेमसंबंध आई निर्मलाला मान्य नव्हते. तिने उर्मिलाला याबद्दल अनेकदा खडसावले आणि विरोध केला. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या आपल्या सख्ख्या आईचाच खून उर्मिलाने प्रियकर रूपेशच्या मदतीने केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. पोलिसांनी मृत निर्मला आत्राम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. पुढील कारवाई अहेरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

संधी गेली, आयुष्यही उद्ध्वस्त...

प्रेमात आंधळ्या झालेल्या या तरुणीने आपल्या प्रेमात आडकाठी ठरते म्हणून आपल्या जन्मदात्या आईचाच खून केल्याने अखेर तिच्यावर गजाआड होण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव घसरले! चांदी तब्बल ₹8,000 ने स्वस्त; पाहा आजचा ताजा भाव

Shoaib Akhtar : पाकिस्तानमधील क्रिकेट नामशेष होण्याच्या मार्गावर! भारताविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तरने सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

Australia vs Sri Lanka: झिम्बाब्वेच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियाची कसोटी, आज श्रीलंकेशी निर्णायक लढत

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

Mumbai : अल्पवयीनाने कारनं उडवलं, १० दिवसांनी पतीचा मृत्यू; पत्नीची प्रकृतीही चिंताजनक

SCROLL FOR NEXT