gadchiroli crime news youth arrested for cutting cake with sword video went viral on social media  Sakal
विदर्भ

Gadchiroli News : तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांना अटक; व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल

वाढदिवसाच्या दिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी अटक केली

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : वाढदिवसाच्या दिवशी रस्त्यावर हुल्लडबाजी करीत तलवारीने केक कापणाऱ्या काही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणांनी तलवारीने केक कापत, हुल्लडबाजी केली. त्यांच्या या प्रकाराचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होताच पोलिसांनी पाच युवकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

केक कापण्यासाठी वापण्यात आलेली तलवार आणि आरोपींच्या गाड्यादेखील पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहे. लोकेश विनोद बोटकावार (वय २२), लोकमित्र खुशाल ठाकरे (वय २५), बादल राजेंद्र भोयर (वय २३), पवन मनोहर ठाकरे(वय २५), राहुल मनोहर नागापुरे (वय २८) सर्व रा. बाजारटोली, ता. आरमोरी, जि. गडचिरोली, अशी आरोपींची नावे आहेत.

आरमोरी शहरालगत रामाळा मार्गावर २५ नोव्हेंबर रोजी रात्री ११ ते १२.३० वाजतादरम्यान या आरोपी तरुणांनी मित्राच्या वाढदिवशी हुल्लडबाजी करत तलवारीने केक कापले. दरम्यान, त्यांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.हा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. यात आरोपी तरुण हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिलेल्या निर्देशानुसार आरमोरी पोलिसांनी तत्काळ पावले उचलत संबंधित तरुणांवर हत्यार प्रतिबंधित कायद्यानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. यातील राहुल नागापुरे फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

या कारवाईत एक धारदार, टोकदार तलवार अंदाचे किंमत १५०० रुपये, एक जुनी वापरती पांढऱ्या रंगाची अॅक्टीवा ६ जी गाडी क्रमांक एम. एच. ३३ ए.ए. १३४० अंदाजे किंमत ५५००० , एक जुनी वापरती काळ्या रंगाची सुपर स्प्लेडंर प्लस वाहन क्रमांक एम.एच ३३ वाय ७८५४ अंदाजे किंमत ४० हजार असा एकूण ९६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

माझ्या प्रेमाला... होणाऱ्या नवऱ्याने प्राजक्ताला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाला-

Video: तेनु काला चश्मा...! योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? कातिल स्टेप्स् पाहून थक्क व्हाल

Weekly Numerology Forecast : साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य! अंकशास्त्रानुसार तुमचा मूलांक सांगणार नशिबाबद्दल खास गोष्टी!

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

SCROLL FOR NEXT