gadchiroli crime police husband killed wife in forest family dispute helper injured esakal
विदर्भ

Gadchiroli Crime News : पतीने कुऱ्हाडीने केली पत्नीची हत्या; मदतीसाठी गेलेल्या मुलीवरही वार

आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकुवर यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा


कोरची (जि. गडचिरोली) : कोरची तालुका मुख्यालयापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील रहिवासी प्रितराम धकाते (वय ५५) याने रविवार (ता. २) सकाळी ११ वाजताच्या सुमारास जंगलात लाकूड तोडायला गेलेली त्याची पत्नी रेखाबाई धकाते (वय ५०)  हिच्यावर कुऱ्हाडीने वार  करून तिला ठार केले.

आरोपी प्रितराम धकाते याने त्याची पत्नी रेखाबाई हिच्या डोक्यावर व पाठीवर कुऱ्हाडीने वार केले. मदतीसाठी गेलेली मुलीगी श्यामबाई देवांगन (वय ३०) हिच्यावरसुद्धा त्याने हल्ला केल्यामुळे तिचा हाथ फ्रॅक्चर झाला व पाठीलासुद्धा मार लागला.

लगेच मुलीने गावाकडे मदतीसाठी धाव घेतली व जंगला नजीक असलेल्या घरातून मोबाईलने आपल्या पतीला संपर्क केला. जावयाने घटनास्थळी जाऊन आपल्या सासूला दुचाकीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

परंतु काही वेळाने रेखाबाईची प्राणज्योत मालवली. प्राप्त माहितीनुसार सकाळी श्यामबाई व रेखाबाई गावातील २ महिलांसोबत जंगलात जळावू लाकूड आणण्याकरिता गेले होते. मनात पूर्वीपासूनच राग धरून असलेल्या प्रितरामने आपल्या पत्नीचा पाठलाग करत जंगलातच तिच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर व पाठीवर वार करून गंभीर जखमी केले.

यापूर्वीसुद्धा प्रितराम आपल्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी देत होता व त्याची लेखी तक्रारसुद्धा कोरची पोलिस स्टेशन येथे करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी प्रितराम धकातेने आपल्या पत्नीला मारण्याकरिता सब्बल (लोखंडी सळाख) उचलली होती.

त्याची तक्रारसुद्धा पोलिस स्टेशन येथे करण्यात आली होती. मागील काही महिन्यांपासून प्रितराम आपल्या परिवारातील सदस्यांना धमकी देत होता. नेहमी दारू पिऊन शिविगाळ करत होता. पुढील चौकशी कोरची पोलिस स्टेशनकडून करण्यात येत आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गणेश फुलकुवर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT