घरगुती भांडणातून पत्नीची हत्या sakal
विदर्भ

पत्नीची हत्या करून पती पोलिसांना शरण

घरगुती भांडणावरून हत्या

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे घरगुती भांडणावरून पतीनेच आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना रविवार (ता. २४) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने पाेलिसांपुढे शरणागती पत्करली. मृत महिलेचे नाव विद्या देविदास चौथाले ( वय २४), रा आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली असे असून आराेपी पतीचे नाव देविदास पुंजाराम चौथाले (वय २६) रा. आष्टी, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली, असे आहे.

प्राप्त माहितीनुसार आष्टी येथील देविदास चौथाले याचा आंतरजातीय विवाह दोन वर्षांपूर्वी एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील विद्या नरोटे हिच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीच्या घरगुती भांडणावरून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. आरोपी देवीदासने पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः आष्टी पोलिस ठाण्यात हजर होऊन त्याने हत्येची कबुली दिली. आरोपी अटकेत असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेची माहिती जाणून घेतली असता आरोपी पतीने घरगुती भांडणावरून रागाच्या भरात पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार कुंदन गावडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गणेश जंगले यांच्या तपासी पथकाकडून सुरू आहे. या धक्कादायक घटनेने आष्टी परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; सांगली जिल्हा बँक निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

Honey Singh News: हनी सिंगचा पाय आणखी खोलात? महाराष्ट्र सायबर सेलने काय दिला अल्टिमेटम?

दमदार संवाद, प्रभावी अभिनय; पण एक गोष्ट खटकते! कसा आहे राजकुमार रावचा ‘प्रहार’?

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाआधी दिल्लीत हायअलर्ट; अभिजीत दिपके राहत असलेल्या घराबाहेर पोलीस दाखल

Ankita Bhandari Case: २४ तासांत बेड्या अन् ८८ दिवसांत ५०० पानांचे चार्जशीट; महिला DIG च्या नेतृत्वाखालील SIT तपास ठरला निर्णायक

SCROLL FOR NEXT