Gadchiroli Crime News esakal
विदर्भ

Gadchiroli : तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक

कोयार, झारेवाडा जंगलांत पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागडअंतर्गत लाहेरी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोयार व झारेवाडा जंगल परिसरात रविवारी पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, विशेष अभियान पथक (सी-६०) व सीआरपीएफ बटालियन ३७ चे जवान संयुक्त नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. तसेच उपविभाग हेडरीअंतर्गत पोमके गट्टा (जां.) हद्दीतील झारेवाडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना एक नक्षलवादी हाती लागला.

कोयार जंगल परिसरात अटक केलेल्या जहाल नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो (वय २९, रा. कोयार, ता. भामरागड), तानी ऊर्फ शशी चमरू पुंगाटी (वय २३, रा. पद्दुर, ता. भामरागड, जि. गडचिरोली) यांचा समावेश आहे. झारेवाडा जंगल परिसरात अटक केलेल्या नक्षलवाद्याचे नाव अर्जुन ऊर्फ महेश रैनू नरोटे (वय २७, रा. झारेवाडा, ता. एटापल्ली), असे आहे.

आतापर्यंत ५७ जण जेरबंद

२०२१-२२ या दोन वर्षांच्या कालावधीत आतापर्यंत एकूण ५७ जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलास यश मिळाले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT