बिबट्या sakal
विदर्भ

गडचिरोली : मुडझा गावालगत आढळला बिबट्याचा मृतदेह

सहायक वनसंरक्षक एस. बी. भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी प्राथमिक चौकशी केली

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : येथील गडचिरोली वनपरीक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलात एका बिबट्याचा मृतदेह रविवार (ता. ३०) आढळून आला. मुडझा गावालगतच्या झुडपी जंगलात कक्ष क्रमांक १६८ मध्ये बिबट्याचा मृतदेह ग्रामस्थांना दिसला. त्यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनाधिकारी घटनास्थळी पोहोचले. पशुधन विकास अधिकारी डॉ. बी. ए. रामटेके यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. मृत बिबट्याचे वय अंदाजे दीड ते दोन वर्षे आहे. सहायक वनसंरक्षक एस. बी. भडके, वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांनी प्राथमिक चौकशी केली असता शरीराचे सर्व अवयव शाबूत असल्याचे दिसून आले. तसेच आजूबाजूला शिकारीबाबतचे कुठलेही ठोस पुरावे आढळले नाहीत. या संपूर्ण कार्यवाहीत मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे,

वन्यजीव प्रेमी अजय कुकडकर, मुडझाचे पोलिस पाटील लोचन मेश्राम, तुलाराम राऊत, ग्रामपंचायत सदस्य सुरेखा सुरपाम आदी उपस्थित होते. उत्तरीय तपासणीनंतर बिबट्याच्या मृतदेहाला अग्नी देण्यात आला. या घटनेचा तपास उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक सोनल भडके व वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT