Naxal sakal
विदर्भ

गडचिरोली : कोटी येथे नक्षल्यांनी जाळले दोन ट्रॅक्टर

नक्षल्यांनी दमदाटी करीत दोन ट्रॅक्टरला आग लावून जाळपोळ केली

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील कोटी पोलीस मदत केंद्राअंतर्गत येत असलेल्या मरकनार ते मुरूमभुशीकडे जाणाऱ्या रस्त्याचे विकासकाम सुरू असताना नक्षलवाद्यांनी दोन ट्रॅक्टरची जाळपोळ केल्याची माहिती प्राथमिक सुत्रांकडून मिळाली आहे.

१३ नोव्हेंबर रोजी ग्यारापत्ती, मर्दिनटोला जंगल परिसरात झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत सेंट्रल कमिटी सदस्य मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांचा पोलिसांनी खात्मा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर तीन दिवसाआधी पत्रके टाकून २७ नोव्हेंबर रोजी बंदचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले होते. पोलिस मदत केंद्र कोटीअंतर्गत मरकनार ते मुरूमभुशी रस्त्याचे विकासकाम कंत्राटदार अखिलेश मिश्रा यांच्यामार्फत काम सुरू आहे.

येथे नक्षल्यांनी दमदाटी करीत दोन ट्रॅक्टरला आग लावून जाळपोळ केली आहे. या घटनेमुळे नक्षलग्रस्त भागात असलेल्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कोटी पोलिसांना माहिती प्राप्त होताच आज (ता. २७) सकाळी घटनेस्थळी पोलिस रवाना झाले असून अधिक तपास करीत असल्याची प्राथमिक माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahisar Fire: दहिसरमध्ये आगीचं रौद्ररूप, परिसरात धुराचे मोठे लोट; गॅरेजला अचानक लागलेल्या आगीचा VIDEO VIRAL

Kagal Peth Naka Highway : कागल-पेठनाका 65 किमी महामार्गाचे काम पुन्हा रखडले! 1200 कोटींचा नवा आराखडा; वाहनचालकांना आणखी अडीच वर्षे वाट पाहावी लागणार?

हर्षवर्धन राणे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये? पुण्याजवळील पानशेतमध्ये दोघांची गुपचूप ट्रिप? एका पोस्टने वाढली चर्चा

Horrible Video: सेलिब्रेशन पडले महागात, ब्राझिलचा फुटबॉलपटू थेट पडला 'खोल' खड्ड्यात; Live सामन्यातील घटनेनंतर सर्वांची पळापळ

Marathi News Live Updates : मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT