crime 
विदर्भ

गडचिरोली: युवतीचा विनयभंग, आरोपीला न्यायालयीन कोठडी

सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : एटापल्लीपासून एक किमी अंतरावरील पंदेवाही टोला या गावांची अनाथ आदिवासी 21 वर्षीय युवती जंगलाच्या दिशेने शौचास जात असल्याचे पाहून तिचे घराशेजारील हॉटेल चालवित असलेला जगन्नाथ शिवकुमार बैरागी (वय 30) या विवाहित नराधमाने विनयभंग केल्याप्रकरणी पीड़ित युवतीच्या तक्रारीवरुन विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंद कायदा व इतर कलमानुसार पोलिसात गुन्हा नोंद झालेल्या आरोपीची गडचिरोली विशेष सत्र न्यायालयाने चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सदर पीड़ित युवती (ता. 24) मंगलवार रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान जंगल परिसराकड़े एकटीच शौचास जात असल्याची संधी साधुन आरोपी जगन्नाथ याने तिचा पाठलाग केला. ही बाब पिडितेच्या लक्षात आल्याने ती घराच्या दिशेने परत यायला लागली. मात्र आरोपिने तिला रस्त्यात गाठून तिचे डोक्याचे केस पकडून जमिनीवर पाडून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तिने मात्र हिमतीने प्रसंगवधान साधुन त्याचे तावडीतून सुटुन घरी पडून येवून आपबीती नातेवाईकांना सांगितली. झटापटीट युवतीचे कपडे फाटले व चेहऱयावर ओरखडे पडले असुन तिने केलेल्या धाडसाने तीला त्या नराधमाच्या तावडीतून सुटका करता आली.

युवतीचे आई-वडील तिच्या बालपनीच मरण पावले असुन ती मोठया भावाकड़े राहते. अनाथ असल्याने तिला शिक्षण घेता आले नाही. याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने आरोपीचे तिचा गैरफायदा घेतला आहे  एटापल्ली पोलिसांनी पीड़ित युवतीच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करुण आरोपीला अटक व बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने नराधमास चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT