Gadchiroli News Youth killed in accident vidarbha Transportation of iron ore Gadchiroli Sakal
विदर्भ

Gadchiroli News : लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत युवक ठार

सुरजागड येथील पहाडावरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक ठार

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : सुरजागड येथील पहाडावरून लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवक ठार झाल्याची घटना साेमवार (ता. १६) रात्री ७ वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम गावाजवळ घडली. निकेश चोखारे (वय ३०) रा. लक्ष्मणपूर, ता. चामोर्शी, असे मृताचे नाव आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज उत्खनन करण्याचे काम लॉयड मेटल्स अॅण्ड एनर्जी व त्रिवेणी अर्थमूव्हर्स या दोन कंपन्या संयुक्तपणे मागील दीड वर्षांपासून करीत आहेत. दररोज पहाडावरून लोहखनिज नेणारे शेकडो ट्रक सुरजागड-एटापल्ली-अहेरी-आष्टी मार्गे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने धावत असतात.

त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. तीन महिन्यांपूर्वी सुरजागड ट्रकच्या अपघातात लगाम गावाजवळ एक महिला ठार झाली होती. त्यावेळी नागरिकांनी १० ट्रक पेटवून दिले होते. वारंवार घडणारे अपघात आणि खराब रस्ते यामुळे नागरिक संतापलेले असतानाच साेमवारी एका ट्रकने निकेश चोखारेचा बळी घेतला.

निकेश हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमध्येच चालक म्हणून कार्यरत होता. पत्नी गरोदर असल्याने तो रजा घेऊन गावी गेला होता. रजा संपल्याने तो कंपनीच्या मद्दीगुडम येथील कार्यालयात गेला.

तेथे हजेरी लावून परताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यास जोरदार धडक दिली. यात तो जागीच ठार झाला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवार दुपारी निकेशच्या पार्थिवावर लक्ष्मणपूर या त्याच्या स्वगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT