विदर्भ

गडचिरोली: सुरजागड खदानीविरोधातील आंदोलकांना अटक; एटापल्ली पोलिसांची कारवाई

सकाळ डिजिटल टीम

एटापल्ली : सुरजागड लोह खदानीवरुन गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत आहेत. आज 29 ऑक्टोंबर रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान खदानीविरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जि.प. सदस्य लालसू नोगोटी, जि.प. सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, शिला गोटा आदींचा समावेश आहे.

गडचिरोली येथील सुरजागड लोहखदान प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि आदिवासी यांनी एल्गार पुकारला आहे. 25 ऑक्टोबर रोजी तब्बल 10 हजार आदिवासींनी एकत्र येत एटापल्ली येथे मोर्चा काढून प्रशासनाला खदान बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर जोपर्यंत खदान बंद होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भुमिका घेत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. आज ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस असताना पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=262764625861797&id=100002531618549

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकूण 25 लोहखाणी प्रस्तावित आहेत. यापैकी सुरजागड येथे खदान सुरु झाली असून स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. खदानीमुळे पहाड नष्ट होणार आहे. तसेच लाखो झाडे तोडली जाणार आहेत. याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊन पर्जन्यमान कमी होऊन भूगर्भातील पाणी पातळीवरही त्याचा परिणाम होणार आहे. शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. भारतीय संविधान, पेसा कायदा, वनहक्क कायदा यांची पायमल्ली करुन दबावतंत्र वापरुन सुरजागड लोहखदान सुरु असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍यांना अटक झाल्याने आता गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण अजूनच तापले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT