crime esakal
विदर्भ

Gadchiroli Crime : गडचिरोली तालुका हादरला! कुऱ्हाडीने पत्नीचे मुंडके केले धडावेगळे

मुलीच्या डोळ्यांदेखत केलेल्या निघृण हत्येने समाजमन सुन्न.

सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) - झोपलेल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण खून करण्याच्या घटनेने संपूर्ण तालुका आज हादरून गेला. येथून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे मंगळवार (ता. २८) रात्री ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

विशेष म्हणजे त्याने ५ वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांदेखत हे भयंकर कृत्य केल्याने समाजमन सुन्न झाले आहे. मृत महिलेचे नाव अमरोतीन बंझार असून आरोपी पती रोहिदास बंझार याला पोलिसांनी अटक केली आहे.रोहिदास बंझार (वय ३८) यांचे अमरोतीन बंझार (वय ३३) हिच्याशी २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना ४ मुली असून नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेच्या वेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती.

मंगळवार रात्री मधल्या दोन मुली आपल्या आजीकडे झोपल्या होत्या, तर लहान मुलगी आईबाबांसोबत झोपली होती. रात्री ३ वाजताच्या सुमारास रोहिदासने कुठला तरी राग मनात धरून पत्नी अमरोतीनच्या मानेवर झोपेतच कुऱ्हाडीने तीन वेळा वार करून ठार केले. हा सारा थरार सोबत झोपलेल्या चिमुकलीसमोरच घडला.

अमरोतीनला ठार केल्यानंतर आरोपी रोहिदासने कुऱ्हाड लपविली. ती कुऱ्हाड कुठे लपविली हे लहान मुलीने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी आरोपी रोहिदासला अटक केली असून पुढील तपास कोरची पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी वाबळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. आईचा निर्घृणपणे खून करून आता क्रूर बापही कारावासात गेल्याने या दाम्पत्या्र्र्रच्या चार निरागस मुली मात्र अनाथ झाल्या आहेत.

मारहाण करण्याची सवय

आरोपी रोहिदासला संतापाच्या भरात मारहाण करण्याची सवय होती, अशी चर्चा आहे. त्याचा पत्नी अमरोतीनसोबत यापूर्वीसुद्धा वाद झाला आहे. रोहिदास हा पत्नी अमरोतीनला मारझोड करतो म्हणून ४ वर्षांपूर्वी बेतकाठी येथे गावात बैठक घेऊन त्याची समजूतही काढण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी आरोपी रोहिदास बोअरचे काम करण्याकरिता दुसऱ्या जिल्ह्यात गेला होता. तिथे त्याने आपल्या मालकालासुद्धा मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jejuri Palkhi Accident : तापाच्या गोळ्या घेतल्या, चक्कर आली अन्... जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताचे धक्कादायक कारण समोर

'तिला मी आता कोणत्याच सिनेमात घेणार नाही' प्रवीण तरडे पत्नी स्नेहलबद्दल असं का म्हणाले... Viral Video

Latest Marathi News Live Update : जेजुरीत वारकऱ्यांच्या अपघातांची मालिका सुरूच; दुचाकीच्या धडकेत दिंडी प्रमुख गंभीर जखमी

Almatti Dam Update : 24 तासांत बदलली परिस्थिती! कोल्हापूर-सांगलीकरांना मोठा दिलासा; 'आलमट्टी'तून पाणी सोडणं पूर्णपणे बंद, कृष्णेची पातळी स्थिर राहणार?

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT